Oppo भारतात आज म्हणजेच 18 जुलै रोजी एक मेगा इव्हेंट होणार आहे. Oppo Reno 8 सिरीज, Oppo Pad Air टॅबलेट आणि Enco X2 TWS आज रात्री होणाऱ्या Oppo च्या या इव्हेंटमध्ये लाँच केले जातील. Reno 8 सीरीज अंतर्गत दोन फोन लाँच केले जातील, ज्यामध्ये Reno 8 आणि Reno 8 Pro यांचा समावेश आहे.
हे सुद्धा वाचा : OTT: Amazon Mini TV वर सबस्क्रिप्शनशिवाय बघा 'या' 5 सर्वोत्कृष्ट सिरीज, मिळेल भरपूर मनोरंजन
Oppo Reno 8 Pro हे मॉडेल MariSilicon X चिप सह लाँच केले जाईल, ज्यावर बेस्ट फोटोग्राफीचा दावा करण्यात आला आहे. Oppo Pad Air हा कंपनीचा पहिला टॅबलेट असेल, असे सांगण्यात येत आहे. लॉन्चिंग इव्हेंट आज संध्याकाळी 6 वाजता सुरू होईल. लॉन्चिंग इव्हेंट कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवर पाहता येईल.
Oppo Reno 8 Pro सह, रात्री देखील 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असेल. याशिवाय, यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.7-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनसोबत 80W सुपरवूक फास्ट चार्जिंग उपलब्ध असेल, ज्याची बॅटरी केवळ 11 मिनिटांत 50 % चार्ज होईल, असा दावा करण्यात आला आहे. Oppo Reno 8 मध्येही हेच फास्ट चार्जिंग उपलब्ध असेल. यात MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर मिळेल, जो अलीकडे OnePlus Nord 2T मध्ये दिसला आहे. या मॉडेलमध्ये MariSilicon X चिप नसेल.
उपकरणांची खरी किंमत लाँच केल्यानंतरच कळेल, पण Oppo Reno 8 ची किंमत 35,000 रुपयांपेक्षा कमी असेल अशी अपेक्षा आहे. Oppo Reno 8 Pro ची किंमत 40,000 रुपयांच्या जवळपास असू शकते.
Oppo Pad Air बद्दल बातमी आहे की, यात स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसरसह 6 GB पर्यंत रॅम मिळेल. यात 10.36-इंच लांबीचा 2K डिस्प्ले असेल. यात Android 12 मिळेल. Oppo चा हा टॅब Xiaomi Pad 5 शी स्पर्धा करेल. Oppo Pad Air ला 18W फास्ट चार्जिंगसह 7100mAh बॅटरी मिळेल. टॅबची किंमत 20,000 रुपयांच्या जवळपास असू शकते.