Oppo Reno 8 आज पहिल्यांदाच देशात विकला जाणार आहे. हा डिवाइसने गेल्या आठवड्यात Oppo Reno 8 Pro सह भारतीय बाजारपेठेत पदार्पण केले होते. नवीनतम रेनो सिरीज डिव्हाइस MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर आणि 4500mAh बॅटरीद्वारे समर्थित आहे. Oppo Reno 8 च्या इतर हायलाइट्समध्ये 6.4-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले, 50MP प्रायमरी कॅमेरा, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 80W SuperVOOC चार्जिंग यांचा समावेश आहे.
हे सुद्धा वाचा : SBI ग्राहकांना विसावा ! तुम्हाला आता बँकेत जाण्याची गरज नाही, WhatsApp च्या माध्यमातून होणार 'ही' कामे
Oppo Reno 8 ची विक्री दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि ओप्पो स्टोअर्सवर केली जाईल. HDFC, SBI, ICICI, आणि Kotak Bank कार्ड वापरून डिव्हाइस खरेदी करण्यावर तुम्हाला 10% झटपट सूट मिळू शकते. Oppo Reno 8 8GB + 128GB व्हेरिएंट 29,999 रुपयांना खरेदी करता येईल.
Reno 8 स्मार्टफोन हा Reno 8 Pro पेक्षा फारसा वेगळा नाही. सर्वप्रथम, यात प्लॅस्टिक बिल्ड आहे, तर प्रो मॉडेलला ग्लास बॅक मिळतो. याशिवाय, यात तुम्हाला 90Hz रिफ्रेश रेटसह फुल-HD रिझोल्यूशन (2,400×1,080 पिक्सेल) सह 6.4-इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले मिळेल. फोनमध्ये तुम्हाला MediaTek 1300 प्रोसेसर दिला जात आहे.
फोनच्या ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपमध्ये समान सेन्सर आहेत. यमध्ये, 2-मेगापिक्सेल GC02M1 मॅक्रो सेन्सर मिळतो. तुम्हाला फोनमध्ये 32-मेगापिक्सलचा फ्रंट सेंसरसुद्धा मिळत आहे. यात 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 4,500mAh बॅटरी देखील मिळेल.