Price Cut : Oppoचा जबरदस्त 5G फोन झाला स्वस्त, थेट 5,000 रुपयांची कपात

Price Cut : Oppoचा जबरदस्त 5G फोन झाला स्वस्त, थेट 5,000 रुपयांची कपात
HIGHLIGHTS

Oppo Reno 7 pro 5G ची किमंत कमी

फोनची किंमत थेट 5,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

फोनची नवी किंमत ऑफिशियल साईट इंडियावर लाईव्ह आहे.

Oppo Reno 7 pro 5G हा एक फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. हा फोन मागील वर्षी लाँच करण्यात आला होता. आता कंपनीने या फोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे. फोनची नवी किंमत ऑफिशियल साईटवर सूचिबद्ध करण्यात आली आहे. या फोनवर थेट 5,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊयात फोनची नवी किंमत- 

Oppo Reno 7 pro 5G ची नवी किंमत 

Oppo Reno 7 pro 5G ची किंमत 39,999 रुपये इतकी होती. मात्र, आता या फोनची किंमत थेट 5,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. आता हा फोन तुम्हाला केवळ 34,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन स्टारलाईट ब्लु आणि स्टारलाईट ब्लॅक कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. फोनची नवी किंमत ऑफिशियल साईट इंडियावर लाईव्ह आहे. 

Oppo Reno 7 pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स 

स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. फोन MediaTek Dimensity 1200-Max चिपसेटसह 12GB RAM आणि 256GB इंटर्नल स्टोरेज सह आहे. या फोनमध्ये 65W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh बॅटरी आहे.

 Oppo Reno 7 Pro च्या मागील पॅनलवर 50MP Sony IMX766 प्राइमरी सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेंसर, 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा लेन्स देण्यात आला आहे. फोनमध्ये कलर टेम्परेचर सेन्सरही देण्यात आला आहे. तसेच, यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 32MP Sony IMX709 फ्रंट कॅमेरा आहे.
 

   
 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo