पहिल्यांदाच मिळतेय मोठी ऑफर ! ‘हा’ महागडा Oppo फोन 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा

पहिल्यांदाच मिळतेय मोठी ऑफर ! ‘हा’ महागडा Oppo फोन 15 हजारांपेक्षा कमी किमतीत खरेदी करा
HIGHLIGHTS

Oppo Reno 7 Proवर भारी डिस्काउंट

हा फोन तुम्हाला अगदी स्वस्तात मिळणार आहे.

त्याबरोबरच, फोनवर बरेच बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत.

जर तुम्ही नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुमचे बजेट 50 हजारांपेक्षा कमी असेल तर आज आम्ही तुम्हाला एका जबरदस्त डील सांगणार आहोत. Oppo रेनो सिरीज लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. तुम्ही अनेक ऑफर्ससह अतिशय कमी किमतीत Oppo Reno 7 Pro खरेदी करू शकणार आहात… 

हे सुद्धा वाचा : प्रतीक्षा संपली ! Flipkart Big Saving Days Sale सुरु, 'या' प्रोडक्ट्सवर मिळतोय बंपर डिस्काउंट

Oppo Reno 7 Pro च्या किमतीत कपात:

या फोनच्या 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 40,990 रुपये आहे. हे 15% फ्लॅट डिस्काउंटसह 34,899 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. यासोबतच 18,050 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही दिली जात आहे.  पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास तुम्हाला हा फोन फक्त 16,849 रुपयांना मिळेल. 

यासोबतच हा फोन EMI वर खरेदी करता येईल. यासाठी तुम्हाला दर महिन्याला किमान 1,667 रुपये भरावे लागतील. बँक ऑफर्समध्ये, येस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 1,500 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. तर, HSBC क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास 2,000 रुपयांपर्यंत सूट दिली जाईल. 2 हजारांपर्यंत कार्ड डिस्काउंटनंतर फोन 14,849 रुपयांना खरेदी करता येईल.

Oppo Reno 7 Pro ची फीचर्स 

फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.5-इंच लांबीचा फुल HD + AMOLED डिस्प्ले आहे. हे MediaTek Dimensity 1200-Max चिपसेटसह येते. यात 12GB रॅम देण्यात आली आहे. फोनमध्ये 4500 mAh बॅटरी आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचा पहिला सेन्सर 50 मेगापिक्सेलचा आहे. दुसरा 8-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. तिसरा 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. यासोबतच 32-मेगापिक्सलचा फ्रंट सेन्सरही देण्यात आला आहे. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo