अशी असेल OPPO RENO 2, RENO 2Z आणि RENO ZF ची किंमत आणि स्पेसिफिकेशंस
OPPO Reno 2, Reno 2Z आणि Reno ZF होतील लॉन्च
28 ऑगस्टला येतील समोर
यावर्षी मे मध्ये OPPO ने आपले दोन स्मार्टफोन्स OPPO Reno आणि Reno 10x Zoom Edition भारतात लॉन्च केले होते. अलीकडेच स्पष्ट झाले होते कि कंपनी 28 ऑगस्टला भारतात एक इवेंट आयोजित करणार आहे ज्यात OPPO Reno सीरीजचे इतर स्मार्टफोन्स सादर केले जातील. My Smart Price च्या रिपोर्टनुसार, नवीन सीरीज मध्ये OPPO Reno 2, Reno 2Z आणि Reno ZF स्मार्टफोन्सचा समावेश असेल. लीक वरून समजले आहे कि हे फोन्स क्वाड रियर कॅमेऱ्या सह येतील आणि Reno 10x Zoom च्या खालील वेरिएंट असतील. पब्लिकेशन ने OPPO च्या या आगामी स्मार्टफोन्सची किंमत आणि स्पेसिफिकेशन पण लीक केले आहेत.
OPPO RENO 2 ची अंदाजे किंमत आणि स्पेक्स
Reno 2 स्मार्टफोन मध्ये 6.5 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल जो फुल HD+ रेजोल्यूशन ऑफर करेल आणि याचा आस्पेक्ट रेश्यो 20:9 आहे. डिस्प्ले मध्ये एक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर मिळू शकतो आणि डिवाइसचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 93.1 टक्के आहे. फोनच्या डिस्प्लेला गोरिला ग्लास 6 चे प्रोटेक्शन दिले जाईल. पण डिवाइसच्या बॅक वर गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन मिळेल. तसेच नवीन हँडसेट 730G प्रोसेसर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह येण्याची शक्यता आहे.
स्मार्टफोनच्या क्वाड कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात एक 48 मेगापिक्सलची सोनी IMX586 प्राइमरी लेंस दिली जाईल जिचा अपर्चर f/1.7 आहे, तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलची लेंस, तिसरा 13 मेगापिक्सलचा सेंसर आणि चौथा 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर दिला जाईल. सेल्फी साठी स्मार्टफोन मध्ये 16 मेगापिक्सलचा शार्कफिन पॉप अप कॅमेरा दिला जाईल आणि त्याचबरोबर LED फ्लॅशला पण जागा दिली जाईल. स्मार्टफोन मध्ये 4,000mAh ची बॅटरी मिळेल जी VOOC 3.0 फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करेल. स्मार्टफोनची किंमत Rs 35,000 असेल.
OPPO RENO 2Z ची अंदाजे किंमत आणि स्पेक्स
Reno 2Z स्मार्टफोन मध्ये 6.53 इंचाचा AMOLED डिस्प्ले मिळेल जो गोरिला ग्लास 5 प्रोटेक्शन सह येईल आणि या फोन मध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट रीडर मिळणार आहे. स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो P90 प्रोसेसर द्वारा संचालित केला जाईल आणि हा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज सह येईल.
Reno 2Z च्या मागे पण क्वाड कॅमेरा सेटअप मिळेल ज्यात एक 48 मेगापिक्सलचा Sony IMX586 प्राइमरी सेंसर होगा आणि दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस तसेच दोन कॅमेरा 2 मेगापिक्सलच्या लेंसचे असतील जे पोर्ट्रेट शॉट्स घेण्यास मदत करतील. डिवाइसच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर डिवाइस मध्ये 4,000mah ची बॅटरी मिळेल जो VOOC 3.0 फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करेल. Reno 2Z ची किंमत Rs 25,000 च्या आत ठेवली जाईल.
OPPO RENO 2F ची अंदाजे किंमत आणि स्पेक्स
OPPO Reno 2F स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन अजूनतरी समोर आले नाहीत पण असा दावा केला गेला आहे कि डिवाइसच्या क्वाड कॅमेरा सेटअप मध्ये सॅमसंगची ISOCELL ब्राइट GM1 48 मेगापिक्सल लेंस मिळेल आणि याची किंमत Rs 20,000 च्या आत ठेवली जाईल.
OPPO Reno 2, Reno 2Z आणि Reno 2F तिन्ही स्मार्टफोन्स ColorOS 6.1 सह एंड्राइड 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम वर लॉन्च केले जातील. फोन्सना आगामी एंड्राइड 10 Q अपडेट पण मिळण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर 2019 पर्यंत कंपनी भारतात 5 स्मार्टफोन्स रिलीज करू शकते.