OPPO Reno 13 सिरीजची भारतीय लाँच डेट कन्फर्म! स्टायलिश कॅमेरा फोन ‘या’ दिवशी भारतात होणार दाखल
Oppo ने भारतात आपली नवीन 'Reno 13' सिरीजच्या भारतीय लाँचची अलीकडेच घोषणा केली.
सिरीजअंतर्गत कंपनी OPPO Reno 13 आणि Reno 13 Pro फोन सादर करणार आहे.
Oppo Reno 13 सिरीज येत्या 9 जानेवारी 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने भारतात आपली नवीन ‘Reno 13’ सिरीजच्या भारतीय लाँचची अलीकडेच घोषणा केली आहे. त्यानंतर, आज आपल्या चाहत्यांना भेट देत कंपनीने आगामी सिरीजची लाँच तारीख देखील जाहीर केली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनी OPPO Reno 13 आणि Reno 13 Pro फोन सादर करणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, भारतात पुढील आठवड्यात ही सिरीज लाँच केली जाईल. चला तर मग जाणून घेऊयात OPPO Reno 13 सिरीजची भारतीय लाँच डेट-
Also Read: आगामी Moto G05 ची लाँच डेट Confirm! मिळेल 50MP Quad Pixel कॅमेरा, जाणून घ्या सर्व तपशील
OPPO Reno 13 सिरीजची भारतीय लाँच डेट
Every moment has a story. Live in the moment as we unveil the launch of #OPPOReno13Series on 9th January 2025.#OPPOAIPhone #LiveInTheMoment
— OPPO India (@OPPOIndia) January 3, 2025
Know more: https://t.co/CQ6etIk4u5 pic.twitter.com/jfceSpDpky
आगामी Oppo Reno 13 सिरीज येत्या 9 जानेवारी 2025 रोजी भारतात लाँच होणार आहे. कंपनीने आपल्या अधिकृत X अकाउंटवर पोस्ट करत सांगितले की, OPPO Reno 13 आणि Reno 13 Pro फोन 9 जानेवारीला भारतीय बाजारात लाँच केले जातील. एवढेच नाही तर, दोन्ही स्मार्टफोन्सचे प्रोडक्ट पेज कंपनीच्या वेबसाइटवर लाईव्ह करण्यात आले आहे.
OPPO Reno 13 सिरीजचे फीचर्स आणि स्पेक्स
OPPO Reno 13 सिरीज आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्यानुसार फोनच्या स्पेक्सबद्दल बोलायचे झाल्यास,
डिस्प्ले
Oppo Reno 13 Pro मध्ये 6.83-इंच लांबीचा 1.5K डिस्प्ले देण्यात आला आहे 120Hz रिफ्रेश रेट आहे. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सारखी फीचर्स आहेत. Oppo Reno 13 5G फोनमध्ये 6.59-इंच लांबीचा 1.5K अल्ट्रा हाय डेफिनेशन डिस्प्ले आहे, जो 120Hz सह येतो.
प्रोसेसर
Oppo Reno 13 Pro फोनमध्ये MediaTek डायमेंसिटी 8350 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. तर, Oppo Reno 13 फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 8350 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
कॅमेरा
हा Oppo Reno 13 Pro मोबाईल ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनल 50MP 3.5X पेरिस्कोप टेलीफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्ससह 50MP IMX890 मुख्य सेन्सर आहे. तर, फोन 50MP सेल्फी कॅमेराला सपोर्ट करतो.
फोटोग्राफीसाठी, त्याच्या मागील पॅनलवर LED फ्लॅशसह सुसज्ज 50MP चा Sony OIS मुख्य सेन्सर आहे, जो 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह कार्य करतो. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, या स्मार्टफोनमध्ये 50MP फ्रंट कॅमेरा मिळेल.
बॅटरी
Oppo Reno 13 Pro मध्ये 5,800 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W वायर्ड फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह उपलब्ध आहे. त्याबरोबरच, Oppo Reno 13 मध्ये 5600 mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह आहे.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile