लेटेस्ट Oppo Reno 12 सीरिजचे स्मार्टफोन्स ग्लोबली लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेक्स। Tech News 

लेटेस्ट Oppo Reno 12 सीरिजचे स्मार्टफोन्स ग्लोबली लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful स्पेक्स। Tech News 
HIGHLIGHTS

आगामी Oppo Reno 12 सिरीज युरोपमध्ये जागतिक स्तरावर लाँच

या सिरीजअंतर्गत OPPO Reno 12 आणि OPPO Reno 12 Pro स्मार्टफोन्सचा समावेश आहे.

Oppo Reno 12 Pro मध्ये AI तंत्रज्ञानाची फीचर्स देखील समाविष्ट आहेत.

Oppo Reno 12 Series: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने मागील महिन्यात चीनच्या होम मार्केटमध्ये आपली लेटेस्ट Reno 12 सीरीज लाँच केली. दरम्यान, आता आगामी Oppo Reno 12 सिरीज युरोपमध्ये जागतिक स्तरावर लाँच करण्यात आली आहे. या सिरीजअंतर्गत OPPO Reno 12 आणि OPPO Reno 12 Pro स्मार्टफोन्सचा समावेश आहे. हे दोन्ही स्मार्टफोन्स लवकरच भारतीय बाजारपेठेत दाखल होण्याची शक्यता आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Oppo Reno 12 सीरिजच्या स्मार्टफोन्सची किंमत आणि सर्व तपशील सविस्तरपणे जाणून घेउयात-

Also Read: आगामी Affordable स्मार्टफोन CMF Phone 1 ‘या’ दिवशी होणार लाँच, कंपनीने केले कन्फर्म, बघा टिझर Video!

OPPO Reno 12 सिरीजची किंमत आणि उपलब्धता

सिरीजअंतर्गत येणाऱ्या OPPO Reno 12 स्मार्टफोनच्या 12GB RAM + 256GB स्टोरेजची किंमत 499 युरो म्हणजेच अंदाजे 44,660 रुपये आहे. हा फोन वापरकर्त्यांना ॲस्ट्रो सिल्व्हर आणि मॅट ब्राउन या दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.

Oppo Reno 12 Pro मॉडेलच्या 12GB RAM + 512GB मेमरी वेरिएंटची किंमत 599 युरो म्हणजेच सुमारे 52,700 रुपये आहे. प्रो फोन नेब्युला सिल्व्हर आणि स्पेस ब्राउन अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये सादर करण्यात आला आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, हे दोन्ही मॉडेल्स या महिन्यापासून युरोप आणि यूकेमध्ये उपलब्ध होतील.

oppo Reno 12 Series
Oppo Reno 12 Series

OPPO Reno 12 चे फीचर्स आणि स्पेक्स

Oppo Reno 12 मध्ये 6.7-इंच लांबीचा FHD+ OLED डिस्प्ले आहे, ज्याचे रिफ्रेश रेट 120Hz इतके आहे. हा डिस्प्ले कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शनसह आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, Reno 12 मध्ये octa core MediaTek Dimensity 7300 Energy 4nm प्रोसेसर उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी, Reno12 मध्ये 50MP Sony LYT-600 सेन्सर, f/1.8 अपर्चर OIS, 8MP अल्ट्रा-वाइड Sony IMX355 सेन्सर आणि मागील पॅनेलवर 2MP मॅक्रो कॅमेरा मिळेल. तर, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP GC32E2 सेन्सर आहे. पॉवरसाठी, या फोनमध्ये मोठी 5000mAh बॅटरी आहे, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगच्या समर्थनासह येईल.

Oppo Reno 12 Pro चे फीचर्स आणि स्पेक्स

Oppo Reno 12 Pro मध्ये 6.7-इंच लांबीचा FHD+ कर्व OLED डिस्प्ले आहे, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट आहे. ही स्क्रीन कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 च्या संरक्षणासह सुसज्ज आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी यात MediaTek Dimensity 7300 Energy 4nm प्रोसेसरसह सादर करण्यात आले आहे. पॉवरसाठी, मोबाईलमध्ये मोठी 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगच्या सुविधेसह येईल.

फोनच्या मागील कॅमेरा सेटअपमध्ये Sony LYT-600 सेन्सरसह 50MP प्रायमरी कॅमेरा, f/1.8 अपर्चर आणि OIS, सोनी IMX355 सेन्सरसह 8MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि Samsung JN5 सेन्सरसह 50MP 2x टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. आकर्षक सेल्फीसाठी यामध्ये Samsung JN5 सेन्सर, f/2.0 अपर्चरसह सुसज्ज 50MP लेन्स आहे. यासह AI तंत्रज्ञानाची फीचर्स देखील समाविष्ट आहेत.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo