OPPO Reno 12 सिरीजची अपेक्षित भारतीय लाँच डेट जाहीर! नवे स्मार्टफोन्स अनेक AI फीचर्सद्वारे सुसज्ज 

 OPPO Reno 12 सिरीजची अपेक्षित भारतीय लाँच डेट जाहीर! नवे स्मार्टफोन्स अनेक AI फीचर्सद्वारे सुसज्ज 
HIGHLIGHTS

Oppo ची लेटेस्ट Reno 12 सीरीज लवकरच भारतात लाँच होणार

OPPO Reno 12 सिरीज आधीच चीन आणि जागतिक बाजारपेठेत उपलब्ध झाली आहे.

OPPO Reno 12 सिरीजचे स्मार्टफोन अनेक AI फीचर्ससह सज्ज आहेत.

OPPO Reno 12 Series: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ची लेटेस्ट Reno 12 सीरीज लवकरच भारतात लाँच होणार आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, OPPO Reno 12 सिरीज आधीच चीन आणि जागतिक बाजारपेठेत उपलब्ध झाली आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने आगामी सिरीज टीज केली होती. अखेर OPPO Reno 12 सिरीजची अपेक्षित भारतीय लाँच डेट जाहीर झाली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता OPPO Reno 12 सिरीज भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-

Also Read: अरे व्वा! iQOO Z9 Lite 5G ची भारतीय लाँच डेट कन्फर्म, सर्वांच्या बजेटमध्ये असेल किंमत?

OPPO Reno 12 सिरीजचे भारतीय लाँच

TheTechOutlook वेबसाईटच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे. Oppo Reno 12 सीरीज भारतात 12 जुलै रोजी लाँच होणार आहे. कंपनीने अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी OPPO Reno 12 आणि OPPO Reno 12 Pro 12 जुलै रोजी भारतीय बाजारपेठेत दाखल होतील अशी पूर्ण अपेक्षा आहे. हे दोन्ही OPPO AI फोन असतील, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने सुसज्ज असतील.

oppo reno 12 series

OPPO Reno 12 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

वर सांगितल्याप्रमाणे, OPPO Reno 12 सिरीज आधीच चीन आणि जागतिक बाजारपेठेत उपलब्ध झाली आहे. भारतात देखील हे स्मार्टफोन्स समान फीचर्ससह सादर केले जातील, अशी शक्यता आहे.

डिस्प्ले

Oppo Reno 12 Pro सह 6.7-इंच लांबीचा फुल HD+ कर्व OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर तंत्रज्ञान देखील आहे. तर, Oppo Reno 12 स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ OLED डिप्सले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. यात देखील इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल.

प्रोसेसर

Oppo Reno 12 Pro स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Energy प्रोसेसर प्रदान केले आहे. तर, Oppo Reno 12 फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 Energy octacore प्रोसेसर आहे.

Reno 12 Series
Reno 12 Series

कॅमेरा

Oppo Reno 12 Pro च्या मागील पॅनलमध्ये 50MP Sony LYT-600 OIS सेन्सर, 8MP Sony IMX355 सेन्सर आणि 2x 50MP Samsung JN5 टेलीफोटो लेन्स आहे. हा फोन सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 50MP Samsung JN5 फ्रंट कॅमेरासह येतो.

Oppo Reno 12 फोनमध्ये फोटोग्राफीसाठी रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50MP Sony LYT-600 OIS मुख्य सेन्सर, 8MP Sony IMX355 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स आहेत. हा फोन सेल्फीसाठी 32MP फ्रंट कॅमेरा सपोर्टसह येतो.

बॅटरी

Oppo Reno 12 Pro स्मार्टफोन 5,000 बॅटरी आहे, जी 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाच्या समर्थनासह आहे . तर, Oppo Reno 12 स्मार्टफोनमध्ये देखील 5,000mAh बॅटरी आहे, जी ज्यामध्ये 80W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo