पहिल्या सेलदरम्यान AI फीचर्सने सुसज्ज OPPO Reno 12 Pro फोनवर मिळतोय बंपर Discount, पहा Best ऑफर्स 

पहिल्या सेलदरम्यान AI फीचर्सने सुसज्ज OPPO Reno 12 Pro फोनवर मिळतोय बंपर Discount, पहा Best ऑफर्स 
HIGHLIGHTS

Oppo Reno 12 Pro कंपनीचा लेटेस्ट प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन आहे.

आज म्हणजेच 18 जुलै 2024 रोजी Oppo Reno 12 Pro फोनची पहिली विक्री भारतात सुरु

विशेषतः या Oppo Reno 12 Pro फोनमध्ये अनेक AI फीचर्स उपलब्ध आहेत.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OPPO ने Oppo Reno 12 Pro गेल्या आठवड्यात भारतात लाँच केला आहे. हा कंपनीचा प्रीमियम मिड-रेंज स्मार्टफोन आहे. आज म्हणजेच 18 जुलै 2024 रोजी या फोनची पहिली विक्री भारतात सुरु झाली आहे. प्रसिद्ध शॉपिंग साईट Flipkart ही विक्री सुरु आहे. मोबाइल फोनमध्ये 50MP सेल्फी आणि रियर कॅमेरा आणि 80W फास्ट चार्जिंग प्रदान करण्यात आले आहे. जाणून घेऊयात OPPO Reno 12 Pro ची किंमत आणि ऑफर्स-

Also Read: अनेक अप्रतिम फीचर्ससह Honor 200 Series भारतीय बाजारात लाँच! पहा किंमत आणि टॉप 5 फीचर्स

OPPO Reno 12 Pro ची किंमत आणि ऑफर्स

OPPO Reno 12 Pro फोन भारतात दोन स्टोरेज मॉडेल्समध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 12GB+256GB व्हेरिएंटची किंमत 36,999 रुपये आहे. तर, फोनचा टॉप मॉडेल म्हणजेच 12GB + 512GB स्टोरेज व्हेरिएंट ची किंमत 40,999 रुपये इतकी आहे.

oppo reno 12 series

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात DBS, HDFC, ICICI, Kotak आणि SBI बँकांकडून फोनवर 3500 रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय, नो-कॉस्ट EMI देखील उपलब्ध आहे. येथून खरेदी करा

OPPO Reno 12 Pro चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno 12 Pro फोनमध्ये पंच-होल डिझाइनसह क्वाड कर्व डिस्प्ले आहे, जो 6.7 इंच लांबीचा आहे. या फोनचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर असून 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज आहे. त्याबरोबरच, सुरक्षिततेसाठी यामध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे.

विशेषतः या फोनमध्ये अनेक AI फीचर्स उपलब्ध आहेत. यात AI Writer, AI Recording Summary आणि AI Eraser 2.0 सारखे AI फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच, पॉवरसाठी यात OPPO Reno 12 Pro मध्ये 5000mAh ची मजबूत बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या हँडसेटमध्ये Wi-Fi, GPS, ब्लूटूथ, ऑडिओ जॅक, ड्युअल सिम स्लॉट आणि USB टाइप-C पोर्ट देखील मिळेल.

OPPO Reno 12 Pro ची किंमत आणि ऑफर्स
Reno 12 Series

फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये OIS सह 50MP मेन लेन्स मिळेल, याव्यतिरिक्त, सेटअपमध्ये 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 50MP टेलिफोटो सेन्सर देखील आहे. तर, सेल्फीसाठी डिव्हाइसच्या पुढील बाजूस 50MP कॅमेरा देखील उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo