बहुप्रतिक्षित Oppo Reno 12 सिरीज अखेर भारतात लाँच! जबरदस्त AI फीचर्ससह सुसज्ज, जाणून घ्या किंमत

Updated on 12-Jul-2024
HIGHLIGHTS

Oppo Reno 12 सिरीज भारतीय बाजरात लाँच करण्यात आली आहे.

सिरीजअंतर्गत Oppo Reno 12 5G आणि Oppo Reno 12 Pro 5G फोन समाविष्ट

Oppo Reno 12 सिरीजमधील दोन्ही स्मार्टफोन AI फीचर्सने सुसज्ज आहेत.

Oppo च्या नव्या Oppo Reno 12 सिरीजच्या भारतीय लाँचची चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होती. अखेर आज कंपनीने Oppo Reno 12 सिरीज भारतात लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत Oppo Reno 12 5G आणि Oppo Reno 12 Pro 5G फोन सादर करण्यात आले आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन जबरदस्त AI फीचर्ससह सुसज्ज आहेत. हे स्मार्टफोन मिड बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आले आहेत. जाणून घेऊयात Oppo Reno 12 सिरीजची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Important Tips: काही तासांतच Smartphone मधील दैनंदिन डेटा संपतो? ‘या’ सोप्या टिप्ससह जास्त काळ टिकेल डेटा

OPPO Reno 12 5G सिरीजची भारतीय किंमत

Oppo Reno 12 5G स्मार्टफोनची किंमत 32,999 रुपये आहे. ही 8GB + 256GB स्टोरेजसह येणाऱ्या व्हेरिएंटची किंमत आहे. या फोनची विक्री 25 जुलै 2024 पासून सुरू होईल. तर, Reno 12 Pro चे 12GB + 256GB स्टोरेज मॉडेल 36,999 रुपये आणि 12GB + 512GB स्टोरेज 40,999 रुपयांना खरेदी करता येईल. या स्मार्टफोनची विक्री 18 जुलैपासून सुरू होणार आहे. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या दोन्ही उपकरणांवर 4000 रुपयांचा त्वरित कॅशबॅक आणि नो कॉस्ट EMI उपलब्ध आहेत.

Oppo Reno 12 सिरीजमधील AI फीचर्स

Oppo ने म्हटले आहे की, Reno 12 सिरीजच्या फोन AI फीचर्सने भरपूर आहेत. कंपनीच्या वेबसाइटवर असे सांगण्यात आले आहे की, या फोनमध्ये AI Eraser2.0, AI best face, AI studio, AI रेकॉर्डिंग समरी, AI रायटर सारखे अनेक AI फीचर्स देण्यात आले आहेत.

Oppo Reno 12 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Oppo Reno 12 आणि Reno 12 Pro मध्ये 6.7-इंच लांबीचा FHD+ कर्व फ्लेक्सिबल AMOLED डिस्प्ले आहे. Reno12 5G च्या स्क्रीनमध्ये Gorilla Glass 7i संरक्षण मिळेल. तर, Reno12 Pro 5G मध्ये Gorilla Glas Victus 2 संरक्षणासह मिळेल. हे दोन्ही फोन 120Hz रिफ्रेश रेटच्या समर्थनासह सज्ज आहेत.

प्रोसेसर

सुरळीत कामकाजासाठी, Reno 12 5G मध्ये MediaTek Dimensity 7300 चिप आहे, तर Pro मॉडेलमध्ये MediaTek Dimensity 9200+ प्रोसेसर आहे.

कॅमेरा

Oppo Reno 12 5G मध्ये मागील बाजूस 50MP चा मुख्य कॅमेरा, 8MP चा वाईड अँगल कॅमेरा आणि 2MP मॅक्रो कॅमेरा आहे. त्याबरोबरच, फोनच्या समोरील बाजूस 32MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

दुसरीकडे, Reno 12 Pro 5G फोन ट्रिपल रियर कॅमेराने सुसज्ज आहे. ज्यामध्ये OIS तंत्रज्ञानासह 50MP Sony LYT-600 प्राथमिक, 2x पोर्ट्रेट झूमसह 50MP Samsung JN5 टेलिफोटो आणि 20x डिजिटल झूम आणि 8MP Sony IMX355 अल्ट्रा वाइड लेन्स उपलब्ध असतील. त्याबरोबरच, फोनमध्ये 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

Oppo Reno 12 आणि Reno 12 Pro फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी आहे. यासह, जलद चार्जिंगसाठी 80W SUPERVOOC तंत्रज्ञान प्रदान करण्यात आला आहे.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :