OPPO Reno 12 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OPPO Reno 12 5G सिरीजच्या भारतीय लाँचची चर्चा बरेच दिवसांपासून सुरु होती. अखेर OPPO Reno 12 5G सिरीजच्या भारतीय लाँच डेटची पुष्टी करण्यात आली आहे. ही सिरीज भारतापूर्वी जागतिक बाजारपेठेत दाखल झाली होती. या सीरीजअंतर्गत, Oppo Reno 12 5G आणि Reno 12 Pro 5G हे दोन स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत सादर केले. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात OPPO Reno 12 5G सिरीजचे भारतीय लॉन्चिंग डिटेल्स-
Also Read: 200MP कॅमेरासह येणाऱ्या Redmi Note 13 Pro वर मिळतोय तब्बल 3,000 रुपयांचा Discount, बघा सर्वोत्तम डील
प्रसिद्ध कंपनी OPPO India ने त्यांच्या अधिकृत X म्हणजेच Twitter हँडलवर OPPO Reno 12 5G सिरीजच्या लाँच डेटची पुष्टी करण्यात आली आहे. हा फोन भारतात 12 जुलै रोजी दुपारी 12 वाजता लाँच केला जाईल. OPPO Reno 12 5G सिरीजचा लाँच इव्हेंट कंपनीच्या सोशल मीडिया हँडलवर LIVE पाहता येईल.
Oppo Reno 12 5G आणि Reno 12 Pro 5G फोन भारतापूर्वीच जागतिक बाजारपेठेत लाँच झाला आहे. त्यानुसार, फोनच्या या सिरीजमध्ये 6.7 इंच लांबीची कर्व इन्फिनिटी व्ह्यू FHD+ AMOLED स्क्रीन आहे. दोन्ही फोनचे डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटने सुसज्ज आहेत. उत्तम परफॉर्मन्ससाठी हे दोन्ही फोन MediaTek Dimensity 7300 प्रोसेसरने सुसज्ज आहेत.
एवढेच नाही तर, या फोनमध्ये MediaTek APU 655 चिप देखील उपलब्ध आहे. ही चिप अनेक AI फीचर्सने सुसज्ज असेल. यात AI क्लियर फेस, AI राइटर, AI रेकॉर्डिंग समरी आणि AI इरेजर 2.0 इ. फीचर्स असतील. Oppo Reno 12 Pro 5G मध्ये सनसेट गोल्ड आणि स्पेस ब्राउन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत. तर, Oppo Reno 12 5G मध्ये Sunset Peach, Matte Brown आणि Astro Silver कलर ऑप्शन्स मिळतील.
फोटोग्राफीसाठी, Reno 12 Pro 5G फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP Sony LYT 600 प्राथमिक कॅमेरा प्रदान केला जाईल. यासह, सेटअपमध्ये 8MP Sony IMX 355 अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि 50MP टेलिफोटो सेन्सर समाविष्ट असेल, ज्याला 2X ऑप्टिकल झूम मिळेल.
त्याबरोबरच, Reno 12 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे. यात टेलिफोटो सेन्सरसह 2MP OV02B10 मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. तसेच, दोन्ही फोनमध्ये 5000mAh बॅटरी असेल, ज्यामध्ये 80W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे. कंपनीचा दावा आहे की, हा फोन 46 मिनिटांत फुल चार्ज होतो.