50MP कॅमेरासह OPPO Reno12 5G फोनची पहिली Sale भारतात सुरु, मिळतील जबरदस्त ऑफर्स

50MP कॅमेरासह OPPO Reno12 5G फोनची पहिली Sale भारतात सुरु, मिळतील जबरदस्त ऑफर्स
HIGHLIGHTS

Oppo ने Oppo Reno12 5G फोन अलीकडेच भारतात लाँच केला.

Oppo Reno12 5G फोनची पहिली विक्री आज म्हणजेच 25 जुलै रोजी सुरु झाली आहे.

Flipkart वर पहिल्या सेलदरम्यान, या डिव्हाइसवर बंपर बँक डिस्काउंट देण्यात येत आहे.

OPPO Reno12 5G: प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने Oppo Reno12 5G फोन अलीकडेच भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनची पहिली विक्री आज म्हणजेच 25 जुलै रोजी सुरु झाली आहे. हा फोन Flipkart वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. पहिल्या सेलदरम्यान, या डिव्हाइसवर बंपर बँक डिस्काउंट देण्यात येत आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता OPPO Reno12 5G वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स जाणून घेऊयात.

Also Read: विशेष डिझाईनसह Xiaomi 14 Civi Limited Edition लवकरच भारतात होणार दाखल, पहा किंमत

OPPO Reno12 5G ची किंमत आणि ऑफर

OPPO Reno12 5G च्या 8GB + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 32,999 रुपये आहे. हा फोन अधिकृत स्टोअर आणि Flipkart वरून खरेदी केला जाऊ शकतो. ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनवर SBI, HDFC, ICICI आणि One Card द्वारे 3000 रुपयांची सूट दिली जात आहे. त्याबरोबरच, हा फोन नो-कॉस्ट EMI आणि YouTube Premium आणि Google One च्या सबस्क्रिप्शनसह 3 महिन्यांसाठी पूर्णपणे मोफत मिळेल. येथून खरेदी करा

Oppo-Reno-12-Series-5G

OPPO Reno12 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO Reno12 5G स्मार्टफोनमध्ये 6.7 इंच लांबीचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे. प्रोटेक्शनसाठी या फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i उपलब्ध आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या मध्ये MediaTek Dimensity 7300 प्रोसेसर उपलब्ध आहे. स्टोरेजबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची स्टोरेज SD कार्डच्या मदतीने वाढवता येईल. सुरक्षेसाठी हँडसेटमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे. याला IP65 रेटिंग मिळाले आहे.

फोटोग्राफीसाठी, Oppo च्या नवीन स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात पहिला 50MP मेन लेन्स, दुसरा 8MP अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि तिसरा 2MP मॅक्रो लेन्स आहे. तर, आकर्षक सेल्फीसाठी यात 32MP सेल्फी कॅमेरा उपलब्ध आहे. कॅमेराद्वारे 4K व्हिडिओ रेकॉर्ड करता येतील. HDR, पोर्ट्रेट आणि नाईट मोड सारखे फीचर्स फोटो क्लिक करण्यासाठी उपलब्ध आहे.

पॉवरसाठी, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, NSA, Dual 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth, GPS, Glonass आणि USB Type-C पोर्ट आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo