मागील काही काळापासून चर्चेत असलेली Oppo Reno 11 सीरीज अखेर टेक विश्वात लाँच झाली आहे. या सिरीजमध्ये Oppo Reno 11 आणि Oppo Reno 11 Pro हे दोन स्मार्टफोन समाविष्ट आहेत. लक्षात घ्या की, दोन्ही फोनमधील बहुतांश फीचर्स सारखेच आहेत. चला तर मग बघुयात नव्या सिरीजमध्ये काय मिळेल विशेष आणि नव्या सिरीजची किंमत-
हे सुद्धा वाचा: Limited Time Deal! Realme च्या Narzo Week Sale मध्ये होतोय ऑफर्सचा वर्षाव, लेटेस्ट स्मार्टफोन्सवर मिळतोय प्रचंड Discount
Oppo Reno 11 सीरीज चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. Oppo Reno 11 च्या 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 2999 म्हणजेच अंदाजे 35,624 रुपये इतकी आहे. तर, Oppo Reno 11 Pro च्या 12GB + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY 3499 म्हणजेच अंदाजे 41,564 रुपये इतकी आहे. ही सिरीज लवकरच भारतीय बाजारात लाँच होणार अशी अपेक्षा आहे.
Oppo Reno 11 मध्ये 6.7-इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचा रीफ्रेश रेट 120Hz आहे. याशिवाय हा फोन MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
Oppo Reno 11 Pro मध्ये 6.74 इंच लांबीचा डिस्प्ले आहे. ज्याचे रिझोल्यूशन 1.5K आहे आणि 120Hz रिफ्रेश रेट आहे.
Oppo Reno 11 हा फोन MediaTek Dimensity 8200 प्रोसेसरने सुसज्ज आहे.
तर, Oppo Reno 11 Pro हा फोन Qualcomm Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरने सुसज्ज आहे. सुरक्षेसाठी, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट देखील आहे.
फोटोग्राफीसाठी Oppo Reno 11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात 50MP LYT600 प्रायमरी कॅमेरा, 8MP IMX355 कॅमेरा आणि 32MP IMX709 टेलिफोटो सेन्सर आहे. त्याबरोबरच, यामध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP Sony IMX709 फ्रंट कॅमेरा आहे.
Oppo Reno 11 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP सोनी IMX890 प्राथमिक कॅमेरा आहे. यात 8MP IMX355 कॅमेरा आणि 32MP IMX709 टेलीफोटो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP IMX709 फ्रंट कॅमेरा आहे.
Oppo Reno 11 फोनची बॅटरी 4800mAh आहे, ज्यामध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. Pro फोनची बॅटरी 4700mAh आहे, ज्यामध्ये 80W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.