Oppo Reno 11 सिरीजच्या लाँचची टेक विश्वात आतुरतेने वाट पाहिली जात आहे. Oppo ने मे मध्ये उत्कृष्ट कॅमेरा सेटअपसह Oppo Reno 10 सिरीज लाँच केली. या सिरीज अंतर्गत Oppo Reno 10, Reno 10 Pro आणि Oppo Reno 10 Pro+ हे तीन स्मार्टफोन आहेत. यानंतर, आता कंपनीने Reno 11 सीरीज लाँच करण्याच्या तयारी सुरु केली आहे. Oppo ची ही सिरीज त्यात उपलब्ध पॉवरफुल कॅमेरा सेटअपसाठी प्रसिद्ध आहे.
दरम्यान, ताज्या लीकमध्ये सीरिजचे लाँच डिटेल्स उघड झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊयात Oppo Reno 11 सिरीज कधी लाँच होणार-
हे सुद्धा वाचा: Amazon Saleचा उद्या शेवटचा दिवस, 1000 रुपयांअंतर्गत मिळतायेत Best Neckband, मनसोक्त गाणी ऐका!
लोकप्रिय टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने, Oppo Reno 11 सिरीजची लाँच डेट जाहीर केली आहे. DCS च्या मते, Oppo ची ही आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज चीनमध्ये नोव्हेंबरच्या शेवटी लाँच केली जाईल, अशी शक्यता आहे. त्याबरोबरच एका रिपोर्टनुसार, टिपस्टर म्हणतो की यावेळी फक्त दोन फोन या सिरीज अंतर्गत लाँच केले जातील. म्हणजेच Reno 11 सिरीजमध्ये फक्त Reno 11 Pro आणि Reno 11 हे स्मार्टफोन्स लाँच केले जातील.
Oppo Reno 11 सिरीजच्या स्मार्टफोन्समध्ये उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, मागील लीकनुसार, Reno 11 सिरीज हँडसेट कर्व एजसह येऊ शकतात. लीक अहवालानुसार रेनो 11 सीरीजच्या बॅक पॅनलला रिफ्रेश डिझाइन मिळेल.
कॅमेरा फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, मागील सीरीज Oppo Reno 10 च्या तुलनेत, काही अपग्रेड्स आगामी स्मार्टफोन्सच्या कॅमेरा सेटअपमध्ये दिसतील. लेटेस्ट आणि आगामी स्मार्टफोनच्या कॅमेरा फीचर्समध्ये पेरिस्कोप टेलीफोटो मॅक्रो लेन्स उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.
लीकमध्ये पुढे आलेली रिपोर्ट जर खरी झाली तर म्हणजेच ही सिरीज नोव्हेंबरच्या अखेरीस लाँच झाली, तर कंपनीकडून येत्या काही दिवसांत त्याच्याशी संबंधित इतर माहिती समोर येऊ शकते. चीननंतर ही सिरीज भारतासह जागतिक बाजारपेठेत दाखल होणार आहे. मात्र, भारतातील फोनमध्ये प्रोसेसर आणि व्हेरिएंटसह काही किरकोळ बदल अपेक्षित आहेत.