Its Here! बहुप्रतीक्षित Oppo Reno 11 सिरीज अखेर टेक विश्वात लाँच, तुमच्या बजेटमध्ये येतील का नवे स्मार्टफोन्स। Tech News
Oppo Reno 11 सिरीज अंतर्गत जागतिक स्तरावर लाँच
सिरीज अंतर्गत Oppo Reno 11 5G आणि Oppo Reno 11 Pro स्मार्टफोन्स समाविष्ट
Oppo Reno 11 सिरीज भारतात 12 जानेवारी रोजी लाँच होणार आहे.
Oppo Reno 11 सिरीज अंतर्गत Oppo Reno 11 5G आणि Oppo Reno 11 Pro भारतात 12 जानेवारी रोजी लॉन्च होणार आहेत. हे दोन्ही मोबाईल फोन आधीच चीनमध्ये उपलब्ध आहेत आणि आज ते ग्लोबली लाँच करण्यात आले आहेत. भारतात येण्यापूर्वी, Oppo Reno 11 सिरीज व्हिएतनाममध्ये दाखल झाली आहे. Reno 11 व्हिएतनाममध्ये ब्लू ओशन वेव्हज आणि कोरल ग्रे कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. तर, Oppo Reno 11 Pro 5G व्हिएतनाममध्ये पर्ल व्हाइट आणि कोरल ग्रे कलरमध्ये लाँच करण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स.
हे सुद्धा वाचा: Vivo Y28 5G Launched: 5000mAh बॅटरीसह नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स। Tech News
Oppo Reno 11 सिरीजची किंमत
हा मोबाइल व्हिएतनाममध्ये सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. ज्यामध्ये 8GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज आहे. या फोनची किंमत 10,990,000 VND म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे 37,000 रुपये आहे. तर, Oppo Reno 11 5G फोन भारतात यापेक्षा कमी किमतीत लॉन्च होण्याची शक्यता आहे.
तर, Oppo Reno 11 Pro 5G फोन 12GB रॅम आणि 512 GB इंटर्नल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 16,990,000 VND आहे, जी भारतीय चलनानुसार 57,900 रुपये इतकी आहे.
Oppo Reno 11 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
डिस्प्ले
Oppo Reno 11 Pro मध्ये 6.74-इंच लांबीचा 1.5K पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक कर्व OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह येतो. तर, Oppo Reno 11 मध्ये 6.70 इंच लांबीचा OLED डिस्प्ले आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटच्या समर्थनासह येतो.
प्रोसेसर
OPPO Reno 11 मध्ये प्रोसेसिंगसाठी, या फोनमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनवलेले मीडियाटेक डायमेंसिटी 8200 ऑक्टा-कोर प्रोसेसर प्रदान करण्यात आला आहे, जो 3.1 GHz पर्यंत क्लॉक स्पीडवर चालतो.
तर, प्रक्रियेसाठी Reno 11 Pro मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8+ Gen 2 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे, ज्यामध्ये 3.2 GHz क्लॉक स्पीडवर चालण्याची पॉवर आहे.
बॅक कॅमेरा
फोटोग्राफीसाठी OPPO Reno 11 फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. येथे मागील पॅनलवर, F/1.8 अपर्चरसह 50MP वाइड अँगल लेन्स, F/2.0 अपर्चरसह 32MP OIS पोर्ट्रेट लेन्स आणि F/2.2 अपर्चरसह 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहेत.
तर, Oppo Reno 11 Pro मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा आहे. येथे मागील पॅनलवर, F/1.8 अपर्चरसह 50MP वाइड अँगल लेन्स, F/2.0 अपर्चरसह 32MP OIS पोर्ट्रेट लेन्स आणि F/2.2 अपर्चरसह 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आहेत.
फ्रंट कॅमेरा
OPPO Reno 11 मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी F/2.4 अपर्चरसह 32MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 5P लेन्स, ओपन लूप फोकस मोटर आणि ऑटो फोकस सारखी फीचर्स देखील आहेत.
तर, Oppo Reno 11 Pro मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP ची सुपर सेन्सिटिव्ह कॅट आय लेन्स आहे, जी F/2.4 अपर्चरवर काम करते. सिरीजमध्ये यात 5P लेन्स, ओपन लूप फोकस मोटर आणि ऑटो फोकस यांसारखी फीचर्स आहेत.
बॅटरी
OPPO Reno 11 स्मार्टफोन बाजारात 4,800 mAh बॅटरीने सुसज्ज करण्यात आला आहे. Oppo मोबाईलमध्ये 67W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञान देखील देण्यात आले आहे. तर, Reno 11 Pro स्मार्टफोनमध्ये 4,700 mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानाला सपोर्ट करतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile