Oppo Reno 11 5G ची पहिली Sale आजपासून सुरू, ‘अशा’ प्रकारे 6000 रुपयांची बचत करा। Tech News 

Oppo Reno 11 5G ची पहिली Sale आजपासून सुरू, ‘अशा’ प्रकारे 6000 रुपयांची बचत करा। Tech News 
HIGHLIGHTS

Oppo Reno 11 5G स्मार्टफोनची भारतात पहिली सेल सुरु

बँक कार्डद्वारे फोनवर 3000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर

OPPO Enco Air 2 Pro वर मिळतेय 500 रुपयांची सवलत

Oppo Reno 11 5G स्मार्टफोनची भारतात विक्री सुरू झाली आहे. हा फोन 12 जानेवारी रोजी Oppo Reno 11 5G सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आला होता. त्यानंतर आज 25 जानेवारी 2024 पासून Oppo Reno 11 5G फोन देखील खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. याशिवाय, फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह सुसज्ज आहे, ज्यामध्ये 8GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज आहे. चला बघुयात Oppo Reno 11 5G वरील पहिल्या सेलमधील ऑफर्स-

Oppo Reno 11 5G ची पहिली सेल

कंपनीने Oppo Reno 11 5G फोन दोन व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. तर, 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट 31,999 रुपयांमध्ये येतो. या फोनची विक्री आजपासून म्हणजेच 25 जानेवारी 2024 पासून भारतात सुरू झाली आहे. तुम्ही Flipkart आणि Oppo India च्या वेबसाइटवरून फोन खरेदी करू शकता.

पहिल्या सेलमधील ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, बँक कार्डद्वारे फोनवर 3000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर दिली जात आहे. यासोबत फोनवर 3000 रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. यासह, फोनच्या खरेदीवर 6000 रुपयांपर्यंतची बचत होईल. फोनच्या खरेदीवर तुम्ही OPPO Enco Air 2 Pro देखील 500 रुपयांच्या सवलतीसह खरेदी करू शकता.

oppo reno 11 5g

Oppo Reno 11 5G चे फीचर्स आणि स्पेक्स

Oppo Reno 11 5G फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा फोन स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी फोन MediaTek Dimensity 7050 प्रोसेसरसह सुसज्ज आहे. फोटोग्राफीसाठी फोन OIS सपोर्टसह 50MP Sony LYT600 प्रायमरी कॅमेरासह येतो. यासह, यात 8MP Sony IMX355 अल्ट्रा-वाइड सेन्सर, 32MP IMX709 टेलिफोटो सेन्सर प्रदान केला आहे, ज्यासह 2X ऑप्टिकल झूम उपलब्ध आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, ज्यामध्ये 67W SuperVOOC फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo