लोकप्रिय स्मार्टफोन OPPO Reno 11 5G च्या किमतीत मोठी कपात, जाणून घ्या नवी किंमत आणि Powerful फीचर्स। Tech News

Updated on 04-Apr-2024
HIGHLIGHTS

OPPO Reno 11 5G स्मार्टफोनच्या किमतीत मोठी कपात

OPPO Reno 11 5G च्या दोन्ही व्हेरिएंटवर 2000 रुपयांची कपात झाली आहे.

फोनमध्ये सेल्फी आणि व्हीडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Oppo ने भारतात लोकप्रिय ‘Reno 11’ सिरीज अलीकडेच भारतीय बाजारात लाँच केली आहे. कंपनीचे हे दोन पॉवरफुल मोबाईल OPPO Reno 11 5G आणि OPPO Reno 11 Pro 5G भारतात लाँच करण्यात आले. आता यापैकी एक स्मार्टफोन Oppo Reno 11 च्या किमतीत कपात करण्यात आली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता Oppo Reno 11 ची नवी किंमत जाणून घेऊयात-

हे सुद्धा वाचा: Price Cut! 50MP प्रायमरी कॅमेरासह येणारा Motorola Edge 40 Neo फोन झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News

OPPO RENO 11

OPPO Reno 11 5G ची नवी किंमत

OPPO Reno 11 5G स्मार्टफोनची किंमत पूर्वी 29,999 रुपये इतकी होती. आता फोनच्या 8GB RAM + 128GB स्टोरेज व्हेरिएंटच्या किमतीत 2000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यानंतर हा स्मार्टफोन 27,999 रुपयांना उपलब्ध आहे. तर, पूर्वी फोनच्या 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये इतकी आहे. या व्हेरिएंटवर देखील 2000 रुपयांची कपात केली गेली आहे. त्यानंतर, हा फोन आता 29,999 रुपयांना उपलब्ध आहे. दोन्ही स्मार्टफोन्सची नवी किंमत OPPO च्या अधिकृत साईटवर लाईव्ह करण्यात आली आहे.

OPPO Reno 11 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo Reno 11 Pro 5G फोन 6.7-इंच लांबीच्या फुल HD+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही एक कर्व AMOLED स्क्रीन आहे, ज्यावर इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेटचा सपोर्ट आहे. सुरळीत कामकाजासाठी या फोनमध्ये MediaTek डायमेंसिटी 7050 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी OPPO Reno 11 ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. त्याच्या मागील पॅनलवर 50MP वाइड अँगल लेन्स आहेत. तर, यासोबत 32 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळतील. एवढेच नाही तर, फोनचा फ्रंट कॅमेरा 32MP चा आहे.

आम्ही तुम्हाला सांगतो की, फोनचा फ्रंट कॅमेरा Sony IMX709 सेन्सर आहे, जो ओपन लूप फोकस मोटर आणि ऑटो फोकस सारख्या फीचर्ससह येतो. या कॅमेऱ्याने 30MPs वर 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग देखील करता येते. पॉवरसाठी यात 5,000mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येते.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :