मागील काही काळापासून चर्चेत असलेली Oppo Reno 11 सीरीज भारतीय बाजारात लाँच होण्यासाठी अखेर सज्ज झाली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनी Oppo Reno 11 आणि Oppo Reno 11 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हे दोन्ही स्मार्टफोन भारतात आणि जागतिक बाजारात एकाच दिवशी लाँच केले जातील. आम्ही तुम्हाला सांगतो की, चीनमध्ये याआधी ही सिरीज लाँच करण्यात आली आहे.
दरम्यान, भारतात या सिरजची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. वेबसाइटने फोनचे डिझाईन आणि सर्व फीचर्सही उघड केले आहेत. याव्यतिरिक्त, लोकप्रिय टिपस्टरने सीरिजची भारतीय लाँच डेट टीज केली आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता बघुयात तपशीलवार माहिती-
हे सुद्धा वाचा: Redmi Note 13 सीरीजच्या लाँचपूर्वी Redmi Note 12 झाला स्वस्त, जाणून घ्या नवी Special प्राईस। Tech News
टिपस्टर इशान अग्रवालने त्याच्या अधिकृत X म्हणजेच ट्विटर खात्यावरून ट्विट करून आगामी Oppo Rena 11 सिरीजची लाँच डेट उघड केली आहे. ट्विटनुसार 11 जानेवारी 2024 रोजी ही सिरीज भारतात आणि जागतिक बाजारात एकाच दिवशी लाँच होण्याची शक्यता आहे.
प्रसिद्ध टिपस्टरने फोनचे खास फीचर्स देखील उघड केले आहे. टिपस्टरने दिलेल्या लीकनुसार, Oppo Reno 11 स्मार्टफोनमध्ये Mediatek Dimensity 1080 प्रोसेसर प्रदान केला जाईल. यासोबतच हा फोन 67W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येईल. याव्यतिरिक्त, Pro मॉडेलला Dimensity 8200 किंवा Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर मिळण्याची अपेक्षा आहे. हा फोन 80W SUPERVOOC चार्जिंग सपोर्टसह येऊ शकतो.
फोटोग्राफीसाठी दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 32MP टेलिफोटो लेन्स दिले जाऊ शकतात. फोन्स Android 14 वर आधारित ColorOS 14 वर कार्य करतील. एवढेच नाही तर, ट्विटमध्ये अधिकृत रेंडर देखील देण्यात आले आहेत. यानुसार फोनमध्ये थोडा वेगळा कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे. फोनचे डिझाईन रेंडरच्या माध्यमातून समोर आले आहे. हा स्मार्टफोन अनेक कलर ऑप्शन्समध्ये दिसतील.