digit zero1 awards

लोकप्रिय OPPO Reno10 Pro 5G च्या किमतीत 2000 रुपयांची घट, Special ऑफर्ससह आणखी स्वस्तात खरेदी करा। Tech News 

लोकप्रिय OPPO Reno10 Pro 5G च्या किमतीत 2000 रुपयांची घट, Special ऑफर्ससह आणखी स्वस्तात खरेदी करा। Tech News 
HIGHLIGHTS

Oppo Reno10 Pro 5G स्मार्टफोन मे 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता.

ब्रँडने आपल्या OPPO Reno10 Pro 5G फोन 2,000 रुपयांनी स्वस्त केला आहे.

कॅनरा बँक आणि वन कार्ड क्रेडिट कार्डवर 10% सूट मिळणार आहे.

Oppo ची Reno सिरीज लाँच झाल्यापासून प्रीमियम विभागात विक्रीसाठी उपलब्ध आहे. Oppo Reno 10 5G स्मार्टफोन या वर्षी म्हणजेच मे 2023 मध्ये लाँच करण्यात आला होता. या सिरीजमध्ये कंपनी पॉवरफुल फीचर्ससह आकर्षक डिझाइन देखील प्रदान करते. जर तुम्ही Reno सीरीजचा नवीन मोबाईल खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ब्रँडने आपल्या OPPO Reno10 Pro 5G फोन 2,000 रुपयांनी स्वस्त केला आहे.

हे सुद्धा वाचा: Tecno Spark Go 2024 फोनच्या भारतीय लाँच डेट कन्फर्म, मिळेल iPhone सारखे Special फीचर। Tech News

OPPO Reno10 Pro 5G ची नवी किंमत

OPPO Reno10 Pro 5G हा मोबाइल ऑनलाइन आणि ऑफलाइन मोडमध्ये 39,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला होता. स्मार्टफोनची नवी किंमत 12 GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी आहे. होय, या फोनची किमंत 2000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यानुसार, आता या फोनची नवी किंमत 37,999 रुपये इतकी झाली आहे. हा डिव्हाईस ग्लॉसी पर्पल आणि सिल्वरी ग्रे अशा दोन कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येईल.

oppo reno 10 pro
oppo reno10 pro 5g

OPPO Reno10 Pro 5G वरील ऑफर्स

फोनवर मिळणाऱ्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, Flipkart वर OPPO Reno10 Pro 5G खरेदीवर कॅनरा बँक आणि वन कार्ड क्रेडिट कार्डवर 10% सूट मिळणार आहे. तसेच, नवीन डिव्हाइसवर 6 महिने नो कॉस्ट EMI ऑप्शन देखील उपलब्ध आहे. यासह वापरकर्ते केवळ 6,667 रुपयांच्या मासिक EMI वर मोबाईल खरेदी करू शकतात.

OPPO Reno10 Pro 5G

OPPO Reno10 Pro 5G मध्ये 6.7 इंच लांबीचा फुल HD + OLED 3D कर्व डिस्प्ले आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन देखील देण्यात आले आहे. हा फोन ऑक्टा कोअर Qualcomm Snapdragon 778G 5G प्रोसेसरने सुसज्ज आहे. डिव्हाइसमध्ये VC लिक्विड कूलिंग तंत्रज्ञान देखील उपलब्ध आहे. डिव्हाइसमध्ये 12GB रॅम आणि 256GB पर्यंत स्टोरेज देखील मिळेल.

फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP IMX890 अल्ट्रा क्लिअर प्रायमरी, 32MP टेली फोटो पोर्ट्रेट कॅमेरा आणि 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा आहे. त्याबरोबरच, सेल्फीसाठी 32MP चा IMX709 फ्रंट लेन्स उपलब्ध आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4600 mAh बॅटरी आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo