Oppo Reno 10 5G Sale Offers: पहिल्या सेलमध्ये मिळतील अप्रतिम ऑफर्स, नवा फोन स्वस्तात खरेदी करा

Updated on 27-Jul-2023
HIGHLIGHTS

Oppo Reno 10 5G, Reno 10 Pro 5G आणि Reno 10 Pro+ स्मार्टफोन्स भारतात अलीकडेच लाँच करण्यात आले.

बेस व्हेरिएंट Oppo Reno 10 5G स्मार्टफोनची सेल आज म्हणेजच 27 जुलैपासून सुरू होणार आहे.

फ्लिपकार्टवर आज दुपारी 12 वाजल्यापासून फोनची सेल सुरू होणार आहे.

अलीकडेच Oppo Reno 10 सिरीज भारतात लाँच करण्यात आली आहे. सिरीजअंतर्गत, Oppo Reno 10 5G, Reno 10 Pro 5G आणि Reno 10 Pro+ स्मार्टफोन्स भारतात अलीकडेच लाँच करण्यात आले. बेस व्हेरिएंट Oppo Reno 10 5G स्मार्टफोनची सेल आज म्हणेजच 27 जुलैपासून सुरू होणार आहे. फ्लिपकार्टवर आज दुपारी 12 वाजल्यापासून फोनची सेल सुरू होणार आहे. या फोनमध्ये खरेदीसाठी आइस ब्लू आणि सिल्व्हर ग्रे रंगाचे पर्याय उपलब्ध आहेत.

Oppo Reno 10 5G ची किंमत आणि सेल ऑफर्स

कंपनीने Oppo Reno 10 5G फोनची किंमत 32,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या किमतीत फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंट उपलब्ध आहे. पहिल्या सेलमध्ये हा फोन अगदी स्वस्तात खरेदी करता येईल. ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, ई-कॉमर्स दिग्गज निवडक बँक कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 2000 रुपयांची त्वरित सूट दिली जाणार आहे. या ऑफरसह, तुम्ही 30,999 रुपयांमध्ये फोन खरेदी करू शकता. 

 

https://twitter.com/OPPOIndia/status/1681923857723305987?ref_src=twsrc%5Etfw

 

Oppo Reno 10 5G चे तपशील

डिस्प्ले आणि प्रोसेसर

Oppo फोनमध्ये 6.7-इंच लांबीचा कर्व डिस्प्ले उपलब्ध आहे. कर्व डिस्प्ले मोबाइल फोनमध्ये अधिक इमर्सिव्ह व्यूविंग एक्सपेरियन्स आणि एक आकर्षक, आधुनिक डिझाइन मिळते. डिस्प्लेचे रिझोल्यूशन 2412×1080 पिक्सेल आहे.  याशिवाय, फोन Mediatek Dimensity 7050 प्रोसेसरने सुसज्ज आहे, या प्रोसेसरमुळे ऍप्स आणि गेमिंगचा एक्सपेरियन्स उत्तम होईल. ज्यामध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

कॅमेरा 

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप केला आहे. या सेटअपमध्ये 64MP अल्ट्रावाइड सेंसर, 32MP टेलीफोटो सेंसर आणि 8MP तीसरा सेंसर समाविष्ट आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, दूर-अंतराच्या वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी टेलिफोटो लेन्समध्ये विशेष घटक असतात. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP कॅमेरा फोन घ्या. 32MP फ्रंट कॅमेरा मोबाइल फोन्सना त्यांच्या उच्च-रिझोल्यूशन लेन्समुळे भारतात लोकप्रियता मिळाली आहे, जे उत्कृष्ट सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्स कॅप्चर करतात.

बॅटरी आणि OS 

फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 67W फास्ट चार्जिंग स्पीड देण्यात आला आहे. 5000mAh बॅटरी असलेले स्टॅंडर्ड स्मार्टफोन वेबवर सर्फ करणे आणि ईमेल तपासणे यासारखी मूलभूत कार्ये करताना एकाच चार्जवर दोन दिवस टिकू शकतात. कंपनीचा दावा आहे की फोनमध्ये 47 मिनिटांत पूर्ण चार्ज होण्याची क्षमता आहे. 

तसेच फोन ColorOS 13.1 वर काम करतो. ColorOS 13.1 मुख्यत्वे सुविधा आणि कार्यक्षमता, डिस्प्ले कार्यक्षमता आणि डिव्हाइसेसमधील अखंड कनेक्शन, सुरक्षा आणि गोपनीयता, आरोग्य वैशिष्ट्ये आणि उत्तम गेमिंग अनुभव यावर फोकस्ड आहे. 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :