Helio P80 चिपसेट सह येणार पहिला स्मार्टफोन असू शकतो OPPO R19

Helio P80 चिपसेट सह येणार पहिला स्मार्टफोन असू शकतो OPPO R19
HIGHLIGHTS

Helio X30 च्या निराशजनक परफॉरमेंस नंतर MediaTek आता Helio P80 चिपसेट घेऊन येत आहे. रिपोर्ट्स नुसार OPPO R19 असा पहिला स्मार्टफोन असू शकतो ज्यात या प्रोसेसरचा वापर केला जाऊ शकतो.

MediaTek आता अफोर्डेबल स्मार्टफोन्स सेगमेंट कडे वळत आहे. Helio P80 चिपसेट वर केल्यानंतर आता कंपनी हा लॉन्च करण्याची तयारी करत आहे. रिपोर्ट्स नुसार MediaTek Helio P80 चिपसेट वापर ओप्पोच्या आगामी लेटेस्ट स्मार्टफोन मध्ये केला जाऊ शकतो. जर असे झाले तर ओप्पोचा R19 पहिला असा स्मार्टफोन बनेल जो MediaTek Helio P80 चिपसेट वर चालेल. ज्यामुळे OPPO R19 मध्ये यूजर्सना चांगली कम्प्यूटिंग परफॉरमेंस मिळू शकते. त्याचबरोबर या नवीन हँडसेट मध्ये अजून खास फीचर येतील जे डिवाइसला अजूनच दमदार बनवतील. 

विशेष म्हणजे OPPO R19 मध्ये MediaTek Helio P80 फीचर आल्यामुळे स्मार्टफोन मध्ये एक अल्युमिनियम बिल्ड आणि टीयरड्रॉप नॉच सोबत एक शानदार डिजाइन मिळेल. ओप्पो आपला नवीन स्मार्टफोन ग्रेडिएंट कलर सह ग्लास बॅक सह लॉन्च करू शकते जी यूजर्सना आकर्षित करू शकते. MediaTek च्या Helio P80 च्या स्मार्टफोन मधील वापरा बद्दल विचार चालू आहे आणि अशा आहे कि SoC TSMC’s 12nm FinFET टेक्नोलॉजी वर आधारित असेल ज्यात octa-core प्रोसेसर दिला गेला असेल.

बोलले जात आहे कि Helio P80 मध्ये इम्प्रूवड आर्किटेक्चर आणि AI परफॉरमेंस सह लॉन्च केला जाईल. असे पण होऊ शकते कि येत्या काळात SoC ची MediaTek AI क्षमता Kirin 980 च्या NPU परफॉरमेंसला मागे टाकू शकते. हे फीचर OPPO R19 स्मार्टफोन मध्ये आल्यामुळे या डिवाइसची किंमत थोडी वाढू शकते. MediaTek Helio P80 चिपसेट ARM ची हाई परफॉरमेंस आणि Cortex-A76 कोर्सचा फायदा घेऊ शकतो आणि जर असे झाले नाही तर त्याच्याकडे Cortex-A73 ऑप्शन म्हणून आहे. पण Helio P80 च्या CPU कॉन्फिग्रेशन बद्दल अजूनतरी काहीच बोलता येणार नाही. स्मार्टफोन मध्ये ग्राफिक प्रोसेसर म्हणून MediaTek Mali-G72 GPU क्लस्टर काउंट वाढवला जाऊ शकतो.

बोलले जात आहे कि MediaTek Helio P80 2019 जानेवारी मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ज्यानंतर OPPO R19 मार्केट मध्ये आपली जागा बनवण्यासाठी येईल.
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo