वॉटरड्रॉप नॉच आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर असलेल्या Oppo R17 चा सेल आज पासून सुरु होईल
Oppo ने या महिन्याच्या सुरवातीला R17 Pro आणि R17 भारतात लॉन्च केले होते आणि आज R17 भारतात अमेझॉन इंडिया च्या माध्यमातून सेल केला जाईल.
महत्वाचे मुद्दे
- R17 मध्ये आहे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, वॉटरड्रॉप नॉच
- R17 Pro आधीच सेल साठी आला आहे
- अमेझॉन इंडिया वर होईल आज नवीन फोनचा सेल
या महिन्याच्या सुरवातीला Oppo ने भारतात आपले दोन स्मार्टफोन्स R17 Pro आणि R17 लॉन्च केले होते. डिवाइसचा Pro वेरिएंट काही दिवसांपूर्वी पासूनच सेल साठी उपलब्ध आहे आणि R17 आज पासून सेल साठी सादर केला जाणार आहे. Oppo R17 ऑगस्ट महिन्यात चीन मध्ये लॉन्च केला गेला होता. या फोन मध्ये वॉटरड्रॉप नॉच, कोर्निंग गोरिला ग्लास 6 प्रोटेक्शन आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असे फिचर आहेत. त्याचबरोबर डिवाइस मध्ये कंपनीची VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जिच्या माध्यमातून पाच मिनिटांत डिवाइस दोन तासांसाठी चार्ज केला जाऊ शकतो.
Oppo R17 ची किंमत आणि ऑफर्स
Oppo R17 भारतात Rs 34,990 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन अमेझॉन इंडिया वर सेल साठी उपलब्ध होईल आणि उपभोक्ता एम्बिएंट ब्लू आणि नियोन पर्पल रंगांपैकी कोणताही एक निवडू शकतात.
युजर्सना डिवाइसच्या खरेदीवर आज अनेक ऑफर्स मिळत आहेत. रिलायंस जियो युजर्स 3.2TB डेटा आणि Rs 4,900 चा कॅशबॅक मिळवू शकतात आणि सोबतच युजर्सना वन-टाइम रिप्लेसमेंट, Rs 5,000 पर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट EMI सारखे पर्याय मिळत आहेत. HDFC बॅंकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्ड युजर्सना 10 टक्क्यांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट पण मिळत आहे.
OPPO R17 स्पेसिफिकेशन्स
OPPO R17 च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 670 चिपसेट सह येतो. R17 पहिला असा मॉडेल आहे जो स्नॅपड्रॅगॉन 670 प्रोसेसर सह येत आहे. गीकबेंचच्या रेकॉर्ड्सनुसार हा बऱ्याचप्रमाणात स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट सारखा आहे, पण कमी पॉवरफुल आहे. स्नॅपड्रॅगॉन 670 एक 10nm चिपसेट आहे. हा चिपसेट एड्रेनो 615 GPU सह येतो. R17 दोन रॅम वेरिएन्ट्स मध्ये येतो, याच्या एका वेरिएंट मध्ये 6GB आणि 8GB रॅम आहे दोन्ही वेरिएन्ट्स मध्ये 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच हा स्मार्टफोन एंड्राइड 8.1 ओरियो वर आधिरत ColorOS 5.2 वर चालतो तसेच 3500mAh ची बॅटरी आहे जी VOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते. तसेच, OPPO R17 नवीन लाइट सेंसिटिव फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह येतो.
कॅमेरा बद्दल बोलायचे तर डिवाइस मध्ये 25MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे, कॅमेरा 8 मोडस सह येतो आणि ब्यूटी इफेक्ट्स च्या रियल-टाइम व्यू ला सपोर्ट करतो. कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस सह सादर केला गेला आहे. रियर पॅनल बद्दल बोलायचे तर तिथे 21MP आणि 8MP चे दोन सेंसर आहेत. रियर कॅमेरा पण आर्टिफिशियल इंटेलिजेंस सह येत आहे.