सेल मध्ये उपलब्ध झाला Oppo चा लेटेस्ट R17 Pro स्मार्टफोन

Updated on 07-Dec-2018
HIGHLIGHTS

Oppo R17 Pro कंपनी ने नुकताच मुंबई मध्ये आयोजित एका इवेंट मध्ये लॉन्च केला होता. डिवाइसची किंमत Rs 45,990 ठेवण्यात आली आहे.

लेटेस्ट Oppo R17 Pro स्मार्टफोन आता भारतात सेल साठी उपलब्ध झाला आहे. युजर्स अमेझॉन इंडिया वर जाऊन हा डिवाइस विकत घेऊ शकतात. डिवाइस काही दिवसांपूर्वी मुंबई मध्ये आयोजित इवेंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे आणि आता डिवाइस लॉन्चच्या तीन दिवसांनंतर सेल साठी पण उपलब्ध झाला आहे. कंपनी ने डिवाइस Rs 45,990 मध्ये लॉन्च केला आहे आणि हा बाजरात आलेला पहिला असा डिवाइस आहे जो स्नॅपड्रॅगॉन 710 SoC सह आला आहे. याआधी कंपनी ने डिवाइस साठी प्री-ऑर्डर प्रक्रिया पण सुरु केली होती.

अमेझॉन इंडिया Oppo R17 Pro च्या खरेदीवर अनेक ऑफर्स देत आहे. ऑफर्स अंतर्गत जर तुम्ही डिवाइस एक्सचेंज ऑफर मध्ये विकत घेतला तर Rs 18,000 चा डिस्काउंट मिळवू शकता. तसेच स्मार्टफोन नो कॉस्ट EMI वर पण विकत घेता येईल. जियो युजर्सना 3.2TB चा 4G डेटा आणि Rs 4,990 पर्यंतचा डिस्काउंट पण मिळत आहे.

Oppo R17 Pro स्पेसिफिकेशंस

R17 Pro च्या इतर स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर हा 6.4 इंचाच्या फुल HD+ AMOLED डिस्प्ले सह येतो ज्यात वॉटर ड्रॉप नॉच देण्यात आली आहे. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो 91.5% आहे आणि याला कोर्निंगच्या लेटेस्ट गोरिला ग्लास 6 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. ड्यूल सिम सह Oppo R17 Pro एंड्रॉयड 8.1 ओरियो वर आधारित कलरओएस 5.2 वर चालतो. स्मार्टफोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 710 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. युजर्सना या डिवाइस मध्ये 8 जीबी रॅम/128 जीबी स्टोरेज मिळत आहे.

 

कॅमेरा सेट-अप पाहता, याच्या बॅक पॅनल वर तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. एक सेंसर 12 मेगापिक्सलचा असेल, ज्याचा अर्पचर/1.5-2.4 आहे. दुसरा सेंसर 20 मेगापिक्सलचा आहे जो अर्पचर एफ/2.6 सह येतो तर तिसरा सेंसर TOF 3D स्टीरियो कॅमेरा आहे. फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर का 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर रियर कॅमेरा सेट-अप ऑप्टिकल इमेज स्टेबलाइज़ेशन, ड्यूल पिक्सल पीडीएएफ आणि अल्ट्रा नाइट मोड सह येतो.

Oppo R17 Pro 3700 एमएएच बॅटरी सह बाजारात आला आहे जी सुपर VOOC टेक्नोलॉजी सह येईल. Oppo R17 Pro मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. कनेक्टिविटी फीचर मध्ये युजर्सना 4जी वीओएलटीई, वाई-फाई, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएस/ ए-जीपीएस आणि एनएफसी सपोर्ट मिळतील. स्मार्टफोनचे डाइमेंशन 157.6×74.6×7.9 मिलीमीटर आणि वजन 183 ग्राम आहे.
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :