विडियो मध्ये दिसत आहे की डिवाइस ची डिजाइन जवळपास R17 सारखीच आहे.
OPPO R17 Pro लवकरच लॉन्च केला जाणार आहे पण त्या आधीच हा चर्चेत आला आहे. चीनच्या या जायंट कंपनी ने एक अधिकृत विडियो टीजर सादर केला आहे ज्यातून डिवाइस मधील ट्रिपल कॅमेरा सेटअपचा खुलासा झाला आहे. डिवाइस ची डिजाइन जवळपास R17 सारखीच आहे.
Huawei P20 Pro प्रमाणे Oppo R17 Pro मधील थर्ड सेंसर एक क्लासिक टेलीफोटो लेंस नसेल तसेच हा एक B/W मोनोक्रोमेटिक सेंसर पण नसेल. हा एक टाइम ऑफ फ्लाइट (ToF) ट्रायडायमेंशनल कॅमेरा असेल, ज्याचा वापर AR साठी करण्यात येईल ज्याप्रमाणे Asus Zenfone AR किंवा Ares मध्ये होता.
Oppo R17 Pro मध्ये 6.4 इंचाचा डिस्प्ले देण्यात येईल जो मिनिमल नॉच आणि फुल HD+ 1080 x 2280 पिक्सल रेजोल्यूशन सह येईल. स्मार्टफोन मध्ये ओक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 710 चिपसेट आणि 8 GB रॅम असेल.