Oppo R17 स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन्स अधिकृतपणे समोर आले आहेत. ही माहिती कंपनी कडून चीन मधील एका वेबसाइट लिस्टिंग वरून समोर आली आहे.
Oppo R17 स्मार्टफोन चे स्पेसिफिकेशन्स अधिकृतपणे समोर आले आहेत. ही माहिती कंपनी कडून चीन मधील एका वेबसाइट लिस्टिंग वरून समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी हा डिवाइस TENAA च्या लिस्टिंग मध्ये दिसला होता. पण आता हा अधिकृतपणे समोर आला आहे.
हा डिवाइस 6.4-इंचाच्या एका गोरिला ग्लास 6 ने सुरक्षित डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहे. त्याचबरोबर यात तुम्हाला एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण मिळत आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोन मध्ये AI क्षमता पण आहे. तसेच यात तुम्हाला ड्यूल कॅमेरा सेटअप पण देण्यात आला आहे.
फोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह स्ट्रीमर ब्लू व्यतिरिक्त नीयॉन पर्पल रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. यासाठी प्री-आर्डर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि याची विक्री 18 ऑगस्ट पासून सुरू करण्यात येईल.
फोन च्या काही अन्य स्पेक्स बद्दल बोलायचे झाले तर यात तुम्हाला ओक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 प्रोसेसर मिळेल, तसेच यात तुम्हाला एक ड्यूल रियर कॅमेरा सेटअप मिळेल, जो 16-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचा एक कॅमेरा कॉम्बो असेल. हा LED फ्लॅश सोबत फोन मध्ये मिळू शकतो.
त्याचबरोबर फोन मध्ये तुम्हाला एक 25-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. फोन मध्ये तुम्हाला एक 3,500mAh क्षमता असलेली बॅटरी पण मिळणार आहे.