Oppo R17 ‘या’ विशेषता असलेला जगातील पहिलाच स्मार्टफोन
Oppo R17 चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे, हा पहिला असा स्मार्टफोन आहे, जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 आणि गोरिला ग्लास 6 च्या संरक्षणा सह लॉन्च करण्यात आला आहे.
Oppo ने आपल्या R सीरीज ला पुढे नेत या यादीत आपला एक नवीन स्मार्टफोन जोडला आहे, कंपनी ने त्यांचा नवीन स्मार्टफोन Oppo R17 चीन मध्ये लॉन्च केला आहे. हा असा पहिलाच स्मार्टफोन आहे जो लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 670 सोबत लॉन्च करण्यात आला आहे.
तसेच हा नॉच सह लॉन्च करण्यात आला आहे, जशी आपण Oppo F9 मध्ये पण बघितली होती. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो की Oppo की R सीरीज चीन पर्यंत मर्यादित आहे. या डिवाइस मध्ये तुम्हाला एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळत आहे, तसेच यात तुम्हाला 8GB पर्यंत रॅम आणि 25-मेगापिक्सलचा AI आधारित सेल्फी कॅमेरा पण मिळत आहे.
Oppo R17 च्या स्पेक्स बद्दल बोलायचे तर चीन मध्ये हा डिवाइस एक मिड-रेंज स्मार्टफोन म्हणून लॉन्च करण्यात आला आहे, तसेच यात एक 6.4-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, जी एक 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाली स्क्रीन आहे. तसेच यात तुम्हाला गोरिला ग्लास 6 चे संरक्षण पण मिळत आहे.
फोन मध्ये स्नॅपड्रॅगन 670 मोबाईल प्लॅटफार्म मिळत आहे. तसेच यात तुम्हाला 8GB च्या रॅम सोबत 128GB ची स्टोरेज मिळत आहे. असे पण वाटते आहे की कंपनी याचे अजून काही वेरिएंट पण लॉन्च करू शकते. सध्यातरी फक्त एकच वेरिएंट उपलब्ध झाला आहे.
फोन मध्ये तुम्हाला ड्यूल सिम सपोर्ट मिळत आहे, त्याचबरोबर यात तुम्हाला एंड्राइड 8.1 Oreo चा सपोर्ट पण मिळत आहे. सोबतच फोन मध्ये तुम्हाला एक ड्यूल कॅमेरा सेटअप पण मिळत आहे. ज्यात 16-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे त्यासोबत यात एक 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा पण आहे. फोन मध्ये एक AI क्षमता असलेला एक 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोन मध्ये एक 3500mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे.