Oppo R15 स्मार्टफोन 31 मार्चला केला जाऊ शकतो लॉन्च; अधिकृत पोस्टर वरून झाला खुलासा

Oppo R15 स्मार्टफोन 31 मार्चला केला जाऊ शकतो लॉन्च; अधिकृत पोस्टर वरून झाला खुलासा
HIGHLIGHTS

एका अधिकृत पोस्टर वरून हे समोर आले आहे की Oppo आपल्या Oppo R15 स्मार्टफोन ला 31 मार्चला लॉन्च करणार आहे. हे पण समोर आले आहे की स्मार्टफोन 16MP Sony IMX519-आधारित कॅमेरा सह सादर केला जाऊ शकतो.

Oppo लवकरच आपले दोन नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोंस लॉन्च करू शकतो. चीनी सोशल मीडिया साइट वेइबो च्या माध्यमातून एका अधिकृत पोस्टर वरून हे समोर आले आहे की Oppo R15 Duo स्मार्टफोंस 31 मार्चला लॉन्च केले जाऊ शकतात. विशेष म्हणजे कंपनी चे हे स्मार्टफोंस जगातील पहिले असे स्मार्टफोंस असतील, जे सोनी च्या लेटेस्ट फ्लॅगशिप इमेज सेंसर IMX519 सह सादर केले जातील. 
या पोस्टर नुसार, या स्मार्टफोंस च्या लॉन्च ला टीवी वर पण दाखवण्यात येईल, हा लॉन्च Zhejiang Satellite TV वर दाखवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त अजून एका पोस्टर वरून हे पण समोर आले आहे की या लॉन्च मध्ये चीनी अॅक्टर Zhang Yishan पण असेल आणि तो या फोनचा ब्रांड अॅम्बेसडर पण असेल. 
 
याव्यतिरिक्त या स्मार्टफोंस च्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर Oppo R15 स्मार्टफोन मध्ये एक 6.28-इंचाचा एक 19:9 चा AMOLED डिस्प्ले असणार आहे, जो 2280×1080 पिक्सेल रेजोल्यूशन सह स्मार्टफोन मध्ये येऊ शकतो. फोन मध्ये मीडियाटेक चा नवीन हेलिओ P60 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे, तसेच यात 6GB चा रॅम पण असेल. फोन मध्ये इंटरनल स्टोरेज म्हणून 128GB स्टोरेज आहे. 
स्मार्टफोन मधील कॅमेरा पाहता यात एक ड्यूल कॅमेरा सेटअप म्हणजे 16+5 मेगापिक्सल चा एक रियर कॅमेरा असणार आहे. सोबतच यात एक 20-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा पण असेल. स्मार्टफोन एंड्राइड 8.1 Oreo सह लॉन्च करण्यात येणार आहे. तसेच यात एक 3450mAh क्षमता असलेली बॅटरी पण असणार आहे. या डिवाइस मध्ये Oppo ची VOOC चार्जिंग टेक्निक असणार आहे. 
याव्यतिरिक्त दुसरा स्मार्टफोन म्हणजे Oppo R15 Dream Mirror Edition. या मध्ये तुम्हाला एक 6.28-इंचाचा 19:9 AMOLED डिस्प्ले 2280×1080 पिक्सल रेजोल्यूशन सह मिळणार आहे. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसर आहे, याव्यतिरिक्त यात पण 6GB रॅम सह 128GB ची इंटरनल स्टोरेज आहे. या स्मार्टफोन मध्ये पण एक ड्यूल कॅमेरा सेटअप असणार आहे, जो एक 16+20 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा असेल आणि फोन मध्ये एक 3300mAh क्षमता असलेली बॅटरी मिळेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo