Price Cut! मोठ्या बॅटरीसह येणारा Oppo Pad Air 6000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News 

Price Cut! मोठ्या बॅटरीसह येणारा Oppo Pad Air 6000 रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत। Tech News 
HIGHLIGHTS

लोकप्रिय टॅबलेट Oppo Pad Air च्या किमतीत मोठी कपात केली आहे.

आता कंपनीने Oppo Pad Air ची 6000 रुपयांनी स्वस्त केली आहे.

टॅबमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7100mAh बॅटरी मिळेल.

Oppo कंपनीने आपला लोकप्रिय टॅबलेट Oppo Pad Air च्या किमतीत मोठी कपात केली आहे. हा टॅब कंपनीने 2022 मध्ये लाँच केला होता. दरम्यान, आता या टॅबलेटची किंमत कमी करण्यात आली आहे. जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये काम करायचे असेल किंवा व्हीडिओ कॉन्फरंस आणि ऑनलाईन क्लासेस करायचे असतील तर, टॅबलेट हे तुमच्यासाठी महत्त्वाचे उपकरण आहे. Oppo Pad Air मध्ये ग्रे आणि पर्पल कलर ऑप्शन आहेत. चला तर मग कंपनीच्या लोकप्रिय टॅबलेट Oppo Pad Air ची नवीन किंमत आणि सर्व तपशील-

हे सुद्धा वाचा: लोकप्रिय iQOO 11 च्या किमतीत मोठी Price Cut! आता ‘या’ नाममात्र दरात खरेदी स्मार्टफोन। Tech News

Oppo Pad Air ची नवी किंमत

वर सांगितल्याप्रमाणे, Oppo कंपनीने हा टॅब जुलै 2022 मध्ये लाँच केला होता. हा टॅब दोन व्हेरिएंटसह सादर करण्यात आला होता. या व्हेरिएंटमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज उपलब्ध आहे. पूर्वी या मॉडेलची किंमत 16,999 रुपये इतकी होती. तर, यात 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल देखील समाविष्ट आहे, ज्याची किंमत 19,999 रुपये आहे. आता कंपनीने Oppo Pad Air ची 6000 रुपयांनी स्वस्त केली आहे.

OPPO PAD AIR PRICE CUT

आता कंपनीने Oppo Pad Air चे 64GB स्टोरेज मॉडेल 4000 रुपयांनी स्वस्त केले आहे. त्यामुळे तुम्ही ते 16,999 रुपयांऐवजी 12,999 रुपयांना खरेदी करू शकता. तर, 128GB स्टोरेज मॉडेल 6000 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहे. त्याची किंमत 19,999 रुपयांवरून थेट 13,999 रुपये झाली आहे. नवीन किंमत कंपनीच्या साइटवर लाइव्ह करण्यात आली आहे.

Oppo Pad Air चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Oppo Pad Air मध्ये 10.36 इंच लांबीचा 2K डिस्प्ले आहे. याशिवाय, सुरळीत कामकाजासाठी हा टॅब Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरने सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला 4GB रॅम आणि 64GB आणि 128GB स्टोरेज ऑप्शन्स मिळतील. फोटोग्राफीसाठी या टॅबमध्ये 8MP चा सिंगल रियर कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. टॅबची बॅटरी 7100mAh आहे, ज्यामध्ये तुम्हाला 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo