5000mAh बॅटरीसह Oppoचा नवीन फोन लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फीचर्स
Oppoचा नवीन फोन Oppo A57 लाँच
नवीन स्मार्टफोनची किंमत एकूण 13,999 रुपये
फोनमध्ये 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी उपलब्ध
Oppo ने आपला नवीन स्मार्टफोन Oppo A57 (2022) भारतात लाँच केला आहे. फोनमध्ये 6.55-इंच लांबीचा डिस्प्ले, 13-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि MediaTek G35 प्रोसेसर सारखे फीचर्स आहेत. फोनमध्ये 33W फास्ट चार्जिंग आणि 5000mAh बॅटरी आहे. चला तर जाणून घेऊयात फोनच्या किंमतीपासून ते फीचर्सपर्यंत संपूर्ण माहिती…
Oppo A57 (2022) किंमत
हा स्मार्टफोन फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये आणण्यात आला आहे. Oppo A57 (2022), जो 4 GB रॅम आणि 64 GB स्टोरेजसह येतो, त्याची किंमत 13,999 रुपये आहे. फोन ग्लोइंग ग्रीन आणि ग्लोइंग ब्लॅक या दोन कलर ऑप्शन्समध्ये येतो. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून फोन खरेदी करता येईल.
हे सुद्धा वाचा : Maximaचे कॉलिंग फीचर असलेले नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच, किंमत 3,000 रुपयांपेक्षा कमी
फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
Oppo A57 स्मार्टफोनमध्ये 6.56-इंच लांबीचा डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आणि रिझोल्यूशन HD + (1,612×720 पिक्सेल) आहे. नवीन स्मार्टफोनमध्ये बायोमेट्रिक्ससाठी फिंगरप्रिंट आणि फेशियल रेकग्निशन सपोर्ट देखील आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, यात USB टाइप-C पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. फोनचे इनबिल्ट स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफीसाठी यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. यामध्ये 13-मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि 2-मेगापिक्सेल मोनो लेन्सचा समावेश आहे. आकर्षक सेल्फीसाठी, यात 8-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनमध्ये 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी मिळेल.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile