Oppo चा नवा स्मार्टफोन लाँच, मिळणार 12 GB रॅम आणि लेटेस्ट प्रोसेसर, जाणून घ्या इतर फीचर्स

Oppo चा नवा स्मार्टफोन लाँच, मिळणार 12 GB रॅम आणि लेटेस्ट प्रोसेसर, जाणून घ्या इतर फीचर्स
HIGHLIGHTS

Oppo चा नवा स्मार्टफोन Oppo A97 5G लाँच

स्मार्टफोनची किंमत सुमारे 23,600 भारतीय रुपये

स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फार्ट चार्जिंगला सपोर्ट करते

चीनी स्मार्टफोन निर्माता Oppo ने स्थानिक बाजारात Oppo A97 5G लाँच केला आहे. हा फोन 48 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो. यात MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आणि 12 GB RAM सह 256 GB स्टोरेज आहे. या फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. हा फोन दोन कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

हे सुद्धा वाचा : भारीच की ! OnePlus च्या नवीन 5G फोनवर सर्वोत्तम ऑफर, मिळतेय 9,500 रुपयांपर्यंत सूट

Oppo A97 5G किंमत

Oppo ने सध्या फक्त देशांतर्गत बाजारात Oppo A97 5G लाँच केला आहे. या फोनच्या 12 GB रॅम सह 256 GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 1,999 युआन (सुमारे 23,600 भारतीय रुपये) आहे. हे उपकरण चीनी ई-व्यावसायिक वेबसाइट Jd.com वर प्री-बुकिंगसाठी सूचीबद्ध केले गेले आहे. त्याची विक्री 15 जुलैपासून सुरू होणार आहे. Oppo A97 5G डीप सी ब्लू आणि क्वाएट नाईट ब्लॅक या दोन कलर व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. फोनचे वजन 194 ग्रॅम आहे.

Oppo A97 5G चे स्पेसिफिकेशन्स 

Oppo A97 5G मध्ये Android 12 आधारित ColorOS 12 ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आली आहे. Oppo A97 5G मध्ये 6.66-इंच लांबीचा फुल HD डिस्प्ले आणि 90Hz रिफ्रेश रेट आहे, त्याचे रिझोल्यूशन (1,080×2,020) आहे. डिस्प्लेवर AI चे स्मार्ट आय प्रोटेक्शन फीचर देण्यात आले आहे. या फोनमध्ये Octa core MediaTek Dimensity 810 5G प्रोसेसर उपलब्ध आहे. फोनमध्ये 12 GB रॅम आहे, जी 19 GB पर्यंत वाढवता येते.

Oppo A97 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्रायमरी सेन्सर 48 मेगापिक्सेल आहे. दुसरा कॅमेरा 2-मेगापिक्सेल डेप्थ सेन्सर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा सेन्सर आहे. 

स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फार्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये दुहेरी स्टीरिओ स्पीकर आहेत आणि BASS इम्प्रूव्ह करण्यासाठी Dirac टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी, हा फोन 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, 3.5mm हेडफोन आणि USB Type-C ला सपोर्ट करतो. सिक्युरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर उपलब्ध आहेत. 

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo