Oppo च्या नव्या फोन बद्दल माहिती आली समोर, यात असेल पॉप-अप सेल्फी कॅमेरा
Oppo चा हा आगामी स्मार्टफोन Oppo R19 किंवा Oppo F11 नावासह येऊ शकतो जयच्या फ्रंटला पॉप-अप सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.
Oppo आपल्या Vivo Nex सीरीजच्या स्मार्टफोन प्रमाणे एका नव्या स्मार्टफोन वर काम करत आहे जो तशाच पॉप-अप सेल्फी कॅमेरा सह येईल. अलीकडेच लीक झालेल्या एका फोटो वरून या फोन मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा असेल आणि डिवाइस एंड्राइड 9 पाई वर आधारित ColorOS 6.0 वर चालेले, असे संकेत मिळाले आहेत. हा फोन Oppo R19 या Oppo F11 नावासह येऊ शकतो. लीक झालेल्या फोटो वरून डिवाइसच्या फ्रंट आणि बॅक डिजाइनची माहिती मिळाली आहे.
टिप्स्टर ईशान अग्रवाल ने ट्विटरच्या माध्यमातून पोस्ट शेयर केली आहे ज्यावरून समजते कि हा आगामी फोन पॉप-अप सेल्फी कॅमेरा सह येईल. सेल्फी कॅमेरा फोनच्या वरच्या कडेवर देण्यात आला आहे आणि मध्यातून बाहेर येतो. Vivo Nex च्या पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्या बद्दल बोलायचे तर यात कॅमेरा डावीकडून बाहेर येतो. डिवाइसच्या बॉटमला खूप बारीक चिन आहे.
फोनला एक ग्लॉसी रिफ्लेक्टिव पॅनल देण्यात आला आहे आणि बॅक पॅनल वर वर्टिकल डुअल कॅमेरा आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि देण्यात आलेला सिम ट्रे बघून वाटते कि हा डिवाइस हाइब्रिड डुअल सिम सपोर्ट सह येईल. टिप्स्टर नुसार हा डिवाइस Oppo R19 किंवा Oppo F11 नावाने लॉन्च केला जाईल.
हा डिवाइस Oppo R19 स्मार्टफोन असण्याची शक्यता जास्त आहे कारण मागील एका रिपोर्ट मध्ये समोर आले होते कि Oppo R19 एका पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह येईल. मागील रिपोर्ट मध्ये असेही समोर आले होते कि डिवाइस मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर ऍड केला जाईल पण नवीन फोटो मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर असू शकतो.
Oppo ने अलीकडेच हि माहिती पण शेअर केली होती कि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात कंपनी आपल्या K-सीरीजचा पहिला स्मार्टफोन Oppo K1 लॉन्च करेल आणि आशा आहे कि हा डिवाइस 20,000 रुपयांच्या श्रेणीत लॉन्च केला जाईल.