Oppoचा नवीन 5G फोन लवकरच भारतात येणार, 8GB RAM सह मिळेल मजबूत बॅटरी

Updated on 03-Jun-2022
HIGHLIGHTS

Oppo K10 चे 5G वेरीएंट लवकरच भारतात लाँच होणार

नवीन स्मार्टफोनची किंमत जवळपास 22,750 रुपये असण्याची शक्यता

फोनमध्ये 5000mAh बॅटरी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह असेल.

Oppo ने मार्च महिन्यात भारतात पहिला K-सिरीज  K10 4G फोन लाँच केला होता. कंपनी आता K10 चे 5G वेरीएंट लाँच करण्याची योजना आखत आहे. सुप्रसिद्ध टिपस्टर मुकुल शर्मा यांनी अलीकडेच खुलासा केला आहे की, Oppo K सिरीजमधील एक नवीन 5G स्मार्टफोन लवकरच भारतात येणार आहे. शर्माने असेही उघड केले की, नवीन Oppo 5G हँडसेट लाँच झाल्यानंतर ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. दुसरीकडे,  Oppo K10 5G भारतात 5G कनेक्टिव्हिटीसह आणखी एक मिड-रेंजर म्हणून लाँच केला जाऊ शकतो, अशीही माहिती समोर आली आहे.

Oppo K10 5Gचे स्पेसिफिकेशन्स

Oppo K10 5G मध्ये octa-core MediaTek Dimensity 810 प्रोसेसर असण्याची अपेक्षा आहे. हे उपकरण 8GB LPDDR4X रॅमसह जोडले जाईल, जे डायनॅमिक रॅम एक्सपेंशन फिचरद्वारे 5GB पर्यंत वाढवता येते. K10 5G मध्ये 128GB इंटर्नल स्टोरेज असण्याची शक्यता आहे. टिपस्टरनुसार, स्टोरेज आणखी वाढवण्यासाठी फोनमध्ये मायक्रो SD कार्ड सपोर्ट देखील असेल.

फोनच्या मागील बाजूस 48-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे, जो 2-मेगापिक्सेलच्या सेकेंडरी  कॅमेरासह असण्याची अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे, Oppo K10 5G मध्ये सेल्फी क्लिक करण्यासाठी आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी फ्रंटला 8-मेगापिक्सेल कॅमेरा असू शकतो. फोन साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर, ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आणि 3.5 मिमी हेडफोन जॅकसह येऊ शकतो. K10 5G फोनमध्ये 5000mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. 

हे सुद्धा वाचा : भारीच की ! Jioच्या 151 रुपयांच्या प्लॅनमध्ये डिझनी + हॉटस्टार फ्री, दीर्घकाळ वैधतेसह उपलब्ध

Oppo K10 5G किंमत

K10 5G चे हे लीक झालेले स्पेसिफिकेशन्स थायलंडमध्ये नुकतेच लाँच झालेल्या Oppo A77 5G सारखे आहेत. जर हा अंदाज खरा ठरला, तर Oppo K10 5G ची किंमत जवळपास 22,750 रुपये असण्याची शक्यता आहे. कारण थायलंडमध्ये Oppo A77 5G ची किंमत 9,999 THB आहे.

Oppo K10 4G चे फीचर्स

Oppo K10 मध्ये 6.5-इंच लांबीचा IPS LCD आहे. तसेच 1080×1920 पिक्सेल रिझोल्युशनसह 90Hz रिफ्रेश रेट देखील आहे. फोनमधील स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर 6GB रॅम आणि 128GB इंटर्नल स्टोरेजसह पेयर केलेला आहे.  Oppo K10 मध्ये रियर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये 50-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. फोनच्या मागील बाजूस 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा डेप्थ-सेन्सिंग कॅमेरा देखील आहे. आकर्षक सेल्फीसाठी, फोनमध्ये 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये 5000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. 

 

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :