हा स्मार्टफोन 1.2GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१०(MSM8916) प्रोसेसर, एड्रेनो ३०६ आणि १जीबी रॅमने सुसज्ज आहे. ह्यात १६जीबीचे अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे, ज्याला मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने १२८जीबीपर्यंत वाढवू शकता.
मोबाईल निर्माता कंपनी ओप्पोने आपला नवीन स्मार्टफोन निओ7 ला भारतात लाँच केले आहे. कंपनीने ह्याची किंमत ९,९९० रुपये ठेवली आहे आणि हा काळ्या आणि पांढ-या अशा दोन रंगात उपलब्ध होईल.
ओप्पो निओ 7 मध्ये ५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन ५४०x९६० आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 1.2GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१० प्रोसेसर दिले गेले आहे. जर आपण ह्याच्या तपशीलावर नजर टाकली तर, आपल्याला समजलेच असेल की, हा ओप्पोचा बजेटमध्ये येणारा आणि परवडणारा असा स्मार्टफोन आहे.
हा स्मार्टफोन 4G LTE कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. त्याचबरोबर हा एक ड्यूल-सिमलासुद्धा सपोर्ट करतो. तसेच ह्यात 1GB रॅम आणि 16GB ची अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. त्याचबरोबर आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने त्याचे स्टोरेज वाढवू शकता. फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह दिला आहे. त्याशिवाय ह्यात ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ज्याच्या माध्यमातून एक उत्कृष्ट सेल्फी काढू शकता. ह्या स्मार्टफोनचे वजन १४१ ग्रॅम आहे आणि ह्यात २४२० mAh ची क्षमता असलेली मोठी बॅटरीसुद्धा दिली गेली आहे,
त्याशिवाय ह्यात वायफाय 802.11 B/G/N, ब्लूटुथ 4.0, मायक्रो-USB, 3G आणि GPS सुद्धा दिले गेले आहे. ह्याची परिमाणs 142.7×71.7×7.55 मिलिमीटर आहे.