ओप्पोने आज आपल्या नवीन स्मार्टफोन ओप्पो निओ 7 ची अधिकृत घोषणा केली. हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन ४१० प्रोसेसरसह लाँच होईल.
आज ओप्पोने आपला निओ सीरिजचा नवीन स्मार्टफोन ओप्पो निओ 7 वरून अधिकृतरित्या पडदा उठवला आहे. हा स्मार्टफोन ओप्पो च्या कलर ओएस २.१ (जो अॅनड्रॉईड लॉलीपॉपवर आधारित आहे) वर चालेल. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये मिरर फिनिश बॅक दिली आहे.
ओप्पो निओ 7 मध्ये ५ इंचाची डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याचे रिझोल्युशन ५४०x९६० आहे. त्याचबरोबर ह्या स्मार्टफोनमध्ये 1.2GHz क्वाड-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४१० प्रोसेसर दिले गेले आहे. जर आपण ह्याच्या तपशीलावर नजर टाकली तर, आपल्याला समजलेच असेल की, हा ओप्पोचा बजेटमध्ये येणारा आणि परवडणारा असा स्मार्टफोन आहे. ह्या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अजून कंपनीने काही सांगितलेले नाही.
हा स्मार्टफोन 4G LTE कनेक्टिव्हिटीने सुसज्ज आहे. त्याचबरोबर हा एक ड्यूल-सिमलासुद्धा सपोर्ट करतो. तसेच ह्यात 1GB रॅम आणि 16GB ची अंतर्गत स्टोरेजसुद्धा दिले आहे. त्याचबरोबर आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने त्याचे स्टोरेज वाढवू शकता. फोटोग्राफीसाठी ८ मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा LED फ्लॅशसह दिला आहे. त्याशिवाय ह्यात ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. ज्याच्या माध्यमातून एक उत्कृष्ट सेल्फी काढू शकता. ह्या स्मार्टफोनचे वजन १४१ ग्रॅम आहे आणि ह्यात २४२० mAh ची क्षमता असलेली मोठी बॅटरीसुद्धा दिली गेली आहे,
ओप्पोच्या अधिकृत निओ 7 प्रोडक्ट पेजवर, ओप्पोने सरळ जाहीर केले आहे की, हा भारत आणि आंतरराष्ट्रीय स्मार्टफोन्सच्या व्हर्जनसह एक US आधारित व्हर्जनसुद्धा आहे. ह्या स्मार्टफोनला येणा-या काही दिवसातच लाँच केले जाऊ शकते.