ओप्पोने चीनमध्ये आपला नवीन स्मार्टफोन ओप्पो A53 लाँच केला आहे. सध्यातरी ह्याची किंमत आणि उपलब्धतेविषी कोणतीही माहिती दिली गेली नाही.
ह्या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांविषयी बोलायचे झाले तर, ह्या स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट दिला गेला आहे. त्याचबरोबर हा स्मार्टफोन कलर ओएस 2.1 वर चालतो, जो अॅनड्रॉईड ५.१ वर आधारित आहे. ह्यात 5.5 इंचाची HD 720×1280 पिक्सेल रिझोल्युशन डिस्प्ले दिली गेली आहे, ज्याची पिक्सेल तीव्रता 267ppi आहे. त्याशिवाय ह्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 616 प्रोसेसर दिला गेला आहे, जो 1.5GHz चा स्पीड देतो. स्मार्टफोनमध्ये २जीबी रॅमसुद्धा दिली गेली आहे.
फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 13MP चा रियर कॅमेरा CMOS सेंसर आणि LED फ्लॅशसह दिला आहे. तर ५ मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरासुद्धा दिला गेला आहे. स्मार्टफोनमध्ये आपल्याला १६जीबीचे अंतर्गत स्टोरेज मिळत आहे, ज्याला आपण मायक्रोएसडी कार्डच्या साहाय्याने वाढवू शकतो. मात्र कंपनीने ह्याला किती वाढवू शकतो, ह्याबाबत माहिती दिलेली नाही.
जर स्मार्टफोनच्या कनेक्टिव्हिटीबाबत बोलायचे झाले तर, ह्यात 4G LTE सह वायफाय, ब्लूटुथ ४.०, NFC, GPS आणि USB 2.0 दिले गेले आहे. त्याशिवाय स्मार्टफोनमध्ये 3075mAh क्षमतेची मोठी बॅटरी दिली गेली आहे.