नव्या रंग रूपात लाँच झाला OPPO K12x 5G नवा स्मार्टफोन! प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे किंमत 

नव्या रंग रूपात लाँच झाला OPPO K12x 5G नवा स्मार्टफोन! प्रत्येकाच्या बजेटमध्ये आहे किंमत 
HIGHLIGHTS

Oppo ने OPPO K12x 5G फोन 'फेदर पिंक' कलर ऑप्शनसह सादर केला आहे.

OPPO K12x 5G फोन Flipkart Big Billion Days Sale मध्ये स्वस्तात मिळेल.

सेलदरम्यान OPPO K12x 5G फक्त 10,999 रुपयांमध्ये मिळेल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने OPPO K12x 5G फोन जुलैमध्ये लाँच केला आहे. हा स्मार्टफोन मिलिटरी ग्रेड रेटिंगद्वारे सुसज्ज आहे. लाँचदरम्यान, हा स्मार्टफोन ब्रीझ ब्लू आणि मिडनाईट व्हायलेट कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे. मात्र, आता हा फोन नवीन ‘फेदर पिंक’ कलर ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन कमी किमतीत अनेक अप्रतिम फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. जाणून घेऊयात किंमत आणि स्पेसिफिकेशन्स-

Also Read: Airtel New Plans: टेलिकॉम दिग्गजने लाँच केले नवे प्रीपेड प्लॅन्स! मिळेल तब्बल 50GB डेटा, किंमतही कमी

OPPO K12x 5G फेदर पिंक कलर व्हेरिएंटची किंमत

OPPO K12x 5G price and availability

OPPO K12x 5G फोनच्या फेदर पिंक मॉडेलची किंमत पूर्वीच्या मॉडेल्ससारखीच असणार आहे. फोनच्या 6GB + 128GB स्टोरेजसह बेस व्हेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर, टॉप 8GB RAM + 256GB व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये आहे. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, OPPO K12x 5G फेदर पिंक कलरमध्ये 26 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपासून बिग बिलियन डेज सेल इव्हेंट दरम्यान फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असेल.

आम्ही तुम्हाला सांगतो की, विशेषतः हा स्मार्टफोन Flipkart Big Billion Days Sale मध्ये फक्त 10,999 रुपयांच्या ऑफर किंमतीत सादर केला जाईल.

OPPO K12x 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OPPO K12x 5G मध्ये मोठा 6.67 इंच लांबीचा HD Plus डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz इतका आहे. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी यामध्ये पांडा ग्लास प्रोटेक्शन लावण्यात आले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, स्मार्टफोन MediaTek Dimensity 6300 चिपसेटद्वारे सुसज्ज आहे. स्टोरेज सेक्शनमध्ये, स्मार्टफोन 6GB, 8GB LPDDR4X रॅम, 8GB पर्यंत व्हर्च्युअल रॅमसह सज्ज आहे. तर, स्टोरेजसाठी 128GB आणि 256GB UFS 2.2 अंतर्गत स्टोरेज मिळेल.

OPPO K12x 5G features

फोटोग्राफीसाठी, या फोनमध्ये LED फ्लॅशसह ड्युअल रियर कॅमेरा मिळेल. सेटअपमध्ये 32MP प्राथमिक, GC32E2 सेन्सर आणि 2MP पोर्ट्रेट सेन्सर आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी, कंपनीने फोनमध्ये 5100mAh बॅटरी दिली आहे, जी 45W SuperVOOC चार्जिंगसह येईल.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo