बहुप्रतीक्षित Oppo K12x 5G भारतीय बाजारात लाँच, जाणून घ्या किंमत आणि Powerful फीचर्स
नवीन Oppo K12x 5G भारतीय बाजारात लाँच
Oppo K12x 5G फोन बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे.
Oppo K12X 5G ची स्मार्टफोनची बॉडी 360 डिग्री डॅमेज प्रूफ आहे.
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ने आपला नवीन Oppo K12x 5G भारतीय बाजारात लाँच केला आहे. कंपनीच्या नव्या K-सिरीजचे हे पहिले डिव्हाईस आहे, जे भारतीय बाजारात लाँच करण्यात आले आहे. या स्मार्टफोनमध्ये पॉवरफुल फीचर्स मिळणार आहेत. या फोनच्या आगमनाने Vivo, Realme आणि Lava सारख्या ब्रँडचे फोन भारतीय बाजारपेठेत स्पर्धा करतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात लेटेस्ट Oppo K12x 5G ची किंमत आणि सर्व तपशील-
Also Read: Upcoming Smartphones This Week: ‘या’ आठवड्यात भारतात लाँच होणार 6 भारी स्मार्टफोन्स, बघा यादी
Oppo K12x 5G ची भारतीय किंमत
Introducing the all-new #OPPOK12x5G with @ifeelkingOG
— OPPO India (@OPPOIndia) July 29, 2024
Sale Starts on 2nd August at 12 noon! #LiveUnstoppable #OPPOxKING
Know more: https://t.co/8jQuyeDluM pic.twitter.com/PWi0TAhzZx
नवा स्मार्टफोन Oppo K12x 5G दोन रॅम व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन बजेट रेंजमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनच्या 6GB + 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे. तर, त्याचे 8GB + 256GB स्टोरेज मॉडेल 15,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या डिव्हाइसची विक्री 2 ऑगस्टपासून Flipkart वर सुरू होईल. हा फोन ब्रीझ ब्लू आणि मिडनाईट व्हायोलेट कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करता येणार आहे.
Oppo K12x 5G चे फीचर्स आणि स्पेक्स
Oppo K12X 5G ची स्मार्टफोनची बॉडी 360 डिग्री डॅमेज प्रूफ आहे. म्हणजेच, हा फोन पडला तरी खराब होणार नाही. स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच लांबीचा HD फ्लॅट डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, या फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 प्रोसेसर देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी, या Oppo च्या नवीन स्मार्टफोनमध्ये LED लाइटसह ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये 32MP प्राथमिक सेन्सर आणि 2MP सेकंडरी लेन्स आहे. मोबाइल फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 8MP कॅमेरा आहे. यामध्ये नाईट आणि पोर्ट्रेट मोडसारखे कॅमेरा फीचर्स देण्यात आले आहेत. पॉवरसाठी, या फोनमध्ये 5100mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W SuperVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
कनेक्टिव्हिटीसाठी, मोबाइल फोनमध्ये 5G, 4G VoLte, Wi-Fi, GPS, ब्लूटूथ आणि USB टाइप-सी पोर्ट आहे. त्याला IP54 रेटिंग मिळाले आहे. तसेच, सिक्योरिटीसाठी, या हँडसेटमध्ये सुरक्षेसाठी फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉकची सुविधा आहे. हा मोबाइल फोन Android 14 वर कार्य करतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile