Oppo ने आज भारतात एक नवीन K सीरीज डिव्हाइस लाँच केले आहे. कंपनीने Oppo K10 5G स्मार्टफोन सादर केला आहे, जो Oppo K10 4G नंतर या सिरीजमधील दुसरा डिवाइस आहे. भारतात लाँच केलेला K10 5G चायनीज व्हेरियंटपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. भारतातील Oppo K10 5G फोन MediaTek Dimensity 810 SoC द्वारे समर्थित आहे आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. चला तर जाणून घेऊयात फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स…
हे सुद्धा वाचा : मोफत 150GB अतिरिक्त डेटा ऑफर करतो VIचा जबरदस्त प्लॅन, OTT सब्स्क्रिप्शनदेखील फ्री
Oppo K10 5G फक्त एकाच व्हेरिएंटमध्ये आला आहे. फोनच्या 8GB + 128GB मॉडेलची किंमत 17,499 रुपये आहे. हे उपकरण 15 जूनपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. K10 5G मिडनाईट ब्लॅक आणि ओशन ब्लू कलर ऑप्शन्समध्ये येतो. विक्रीच्या पहिल्या दिवशी, तुम्ही SBI कार्ड, कोटक, एक्सिस आणि बँक ऑफ बडोदा कार्ड्सवर 1,500 रुपयांपर्यंत फ्लॅट डिस्काउंट मिळवू शकता. दुसरीकडे, जर तुम्ही हा फोन EMI वर विकत घेतला तर तुम्हाला महिन्याला फक्त 607 रुपये भरून तो खरेदी करता येईल.
OPPO K10 5G मध्ये 6.56-इंच लांबीचा HD+ डिस्प्ले आहे. ज्याचा LCD पॅनल 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यामध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर आणि 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000mAh बॅटरी आहे. OPPO K10 5G मध्ये 128GB स्टोरेज आणि 8GB RAM आहे.
याव्यतिरिक्त, OPPO K10 5G ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. ज्यामध्ये 48MP प्रायमरी शूटर आणि 2MP डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंटला 8MP कॅमेरा आहे. OPPO K0 5G मध्ये सिक्युरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.