अलीकडेच बातमी समोर आली होती कि Oppo आपले इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेले स्मार्टफोन भारतीय बाजारात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. पण तेव्हा कंपनी ने डिवाइसच्या नावाचा खुलासा केला नव्हता, पण आता असे वाटत आहे कि हा डिवाइस Oppo K1 असेल. नवीन रिपोर्ट अनुसार, कंपनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात आपला हा स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे आणि हा स्मार्टफोन खासकरून फ्लिपकार्ट वर सेल केला जाईल. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर रिपोर्ट वरून समजले आहे कि डिवाइस Rs. 20,000 च्या श्रेणीत लॉन्च केला जाऊ शकतो.
Oppo K1 गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये चीन मध्ये लॉन्च केला गेला होता. भारतीय बाजारात हा Oppo च्या K-सीरीजचा पहिला स्मार्टफोन असेल. आतापर्यंत भारतात कंपनी ने आपल्या R-सीरीज, F-सीरीज आणि A-सीरीज वर अधिक भर दिला आहे.
स्पेसिफिकेशन पाहता Oppo K1 स्मार्टफोन 6.4 इंचाच्या सुपर AMOLED डिस्प्ले ने सुसज्ज असेल जो 2340 x 1080 पिक्सल रेजोल्यूशन ऑफर करेल आणि 91 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो सह येईल. डिस्प्लेला कोर्निंग गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन मिळेल.
डिवाइस क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 660 ओक्टा-कोर प्रोसेसर ने सुसज्ज असेल आणि 4GB किंवा 6GB रॅम सह येईल. दोन्ही वेरिएंट्स मध्ये 64GB इंटरनल स्टोरेज दिली जाईल आणि फोनची स्टोरेज वाढवण्याची माइक्रो SD कार्ड स्लॉट सपोर्ट पण मिळेल. कॅमेरा डिपार्टमेंट बद्दल बोलायचे तर डिवाइसच्या मागील बाजूस डुअल-कॅमेरा सेटअप दिला जाईल आणि कॅमेरा LED फ्लॅश सह लेफ्ट कॉर्नर वर हॉरिजॉन्टली फिट केला जाईल. कॅमेरा सेटअप मध्ये एक 16 मेगापिक्सल आणि दूसरा 2 मेगापिक्सलचा सेंसर असेल आणि हा AI वर आधारित फीचर्स सह येईल जो कॅमेरा परफॉरमेंस वाढवेल. फ्रंट-फेसिंग कॅमेरा पाहता हँडसेट 25 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह येईल.
हा फोन कंपनीच्या ColorOS 5.2 सह एंड्राइड 8.1 ओरियो ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल. कनेक्टिविटी साठी 4G VoLTE, Wi-Fi i 802.11 a/b/g/n/ac, ब्लूटूथ v5.0, GPS/ A-GPS, आणि GLONASS चे पर्याय आहेत. हा स्मार्टफोन 3,500mAh च्या बॅटरी सह येईल आणि सुपर VOOC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.