सणासुदीच्या हंगामात अनेक स्मार्टफोन्स कंपन्यांनी आपल्या उपकरणांवर अनेक आकर्षक जाहीर केल्या आहेत. आता या यादीत प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता OPPO India चे नाव देखील समाविष्ट झाले आहेत. सणासुदीनिमित्त Oppo ने एक उत्तम ऑफर सादर केली आहे, जी ‘Pay 0, Worry 0, Win ₹ 10 Lakh’ असा टॅगलाईनसह सादर करण्यात आली आहे. याचाच अर्थ तुम्हाला काहीही खर्च करण्याची गरज नाही किंवा काळजी करण्याची गरज नाही आणि 10 लाख रुपये जिंकण्याची संधी आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, या ऑफर अंतर्गत, OPPO स्मार्टफोन नो कॉस्ट EMI, झिरो डाउन पेमेंट, झिरो प्रोसेसिंग फी आणि इन्स्टंट कॅशबॅकसह खरेदी केले जाऊ शकतात. या ऑफर OPPO Reno 12 Pro 5G आणि F27 Pro+ 5G वर OPPO इंडियाच्या रिटेल स्टोअर, OPPO ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि Amazon वरून 1 ते 7 नोव्हेंबर 2024 दरम्यान ऑफर्सचा लाभ घेता येईल.
Also Read: WhatsApp वर मिळेल Instagram सारखे फिचर! आता स्टेटस ठेवणे होणार आणखी मजेशीर, पहा डिटेल्स
7 नोव्हेंबरपूर्वी स्मार्टफोन खरेदी करणारे ग्राहक ‘My OPPO Exclusive Raffle’ मध्ये सामील होऊ शकतात. यासह 10 लाख रुपये आणि त्याशिवाय OPPO Find N3 Flip foldable स्मार्टफोन, OPPO Enco Buds2 TWS, OPPO Pads, Screen Protector Plan, OPPO Care+ सदस्यता, रिवॉर्ड पॉइंट आणि इतर रोख बक्षिसे जिंकण्याची संधी मिळवू शकतात. ऑफर्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी Oppo India च्या अधिकृत साईटला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.
OPPO भारतातील लोकप्रिय Oppo Reno12 Pro 5G आणि Oppo F27 Pro+ 5G, OPPO F27 5G आणि OPPO A3 Pro सारख्या फोन्सवर ग्राहक 12 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI आणि 18 ते 24 महिन्यांपर्यंतच्या लो-कॉस्ट EMI ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात. त्याबरोबरच, बजाज फायनान्स, IDFC फर्स्ट बँक, HDB फायनान्स, TVS फायनान्स आणि कोटक बँक या आघाडीच्या भागीदारांसह ग्राहक 6 ते 9 महिन्यांच्या कालावधीसाठी झिरो प्रोसेसिंग फीचा लाभ घेऊ शकतात.
एवढेच नाही तर, ग्राहकांना 11 किंवा 12 महिन्यांपर्यंत शून्य डाउन पेमेंट निवडण्याचा पर्याय देखील असेल. तसेच, तुम्ही HDFC बँक, ICICI बँक, SBI, बँक ऑफ बडोदा, IDFC फर्स्ट बँक, कोटक बँक, AU स्मॉल फायनान्स, RBL बँक, DBS आणि फेडरल बँक कार्ड्सवर EMI आणि नॉन-EMI व्यवहारांवर 10% झटपट कॅशबॅक देखील मिळवू शकता.
याव्यतिरिक्त, IDFC फर्स्ट बँकेत Reno12 मालिकेवर 1 EMI चा कॅशबॅक देखील उपलब्ध आहे. TVS क्रेडिट कार्डवर F27 Pro+ 5G आणि Reno12 सिरीजसाठी 1,999 रुपयांची फिक्स्ड EMI ऑफर उपलब्ध आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, OPPO India आपल्या वापरकर्त्यांना सामर्थ्य आणि विश्वासार्हतेसह प्रीमियम अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे. अधिक माहितीसाठी Oppo India च्या अधिकृत साईटला भेट द्या किंवा येथे क्लिक करा.