Oppo Find X8 सिरीज अखेर भारतीय बाजारात लाँच! जाणून घ्या किंमत आणि टॉप फीचर्स

Updated on 21-Nov-2024
HIGHLIGHTS

Oppo ची नवी Oppo Find X8 सीरीज दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात लाँच

सीरीजअंतर्गत कंपनीने Oppo Find X8 आणि Oppo Find X8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले.

Oppo Find X8 सीरीज फोनची विक्री 3 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल.

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ची नवी Oppo Find X8 सीरीज दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतात लाँच करण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, या सीरीजअंतर्गत कंपनीने Oppo Find X8 आणि Oppo Find X8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत. स्मार्टफोन्स आधीच चीनमध्ये लाँच झाले होते, तर आज ते भारतात आणि जागतिक बाजारपेठेत लाँच करण्यात आले आहे. लक्षात घ्या की, सिरीजमधील दोन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन 5G कनेक्टिव्हिटीसह येतात. हे स्मार्टफोन लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart च्या माध्यमातून विकले जातील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Oppo Find X8 सिरीजची किंमत आणि तपशील-

Also Read: Best Offers! लेटेस्ट IQOO स्मार्टफोन्सवर मिळतोय हजारो रुपयांचा Discount, पहा सर्वोत्तम डील्स

Oppo Find X8 सिरीजची भारतीय किंमत

नवीनतम Oppo Find X8 5G स्मार्टफोन 69,999 च्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. ही किंमत फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची आहे. त्याबरोबरच, 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 79,999 रुपये आहे. हा फोन स्पेस ब्लॅक आणि स्टार ग्रे कलर ऑप्शन्ससह सादर करण्यात आला आहे.

तर, दुसरीकडे, Oppo Find X8 Pro स्मार्टफोन 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनची किंमत 99,999 रुपये इतकी निश्चित केली गेली आहे. प्रो व्हेरिएंट पर्ल व्हाइट आणि स्पेस ब्लॅक कलर ऑप्शन्ससह उपलब्ध आहेत. उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनची विक्री 3 डिसेंबर 2024 पासून सुरू होईल.

Oppo Find X8 सिरीजचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले:

Oppo Find X8 स्मार्टफोनमध्ये 6.59 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तर, प्रो व्हेरिएंटमध्ये 6.78 इंच लांबीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. त्याचे पिक्सेल रिझोल्यूशन 2780 × 1264, 120Hz पर्यंत रीफ्रेश रेट आणि 1600 nits पर्यंत पीक ब्राइटनेस आहे. दोन्ही स्मार्टफोन अंडरडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतात.

प्रोसेसर:

स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, बेस मॉडेल MediaTek Dimensity 9400 चिपसेटसह येतो. तर, सिरीजमधील प्रो व्हेरिएंट उत्तम परफॉर्मन्ससाठी स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसरसह सज्ज आहे.

बॅटरी:

Oppo Find X8 फोनमध्ये 5630mAh बॅटरी आहे, जी 80W SUPERVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. तर, त्याचा प्रो व्हेरिएंट 5910mAh बॅटरीसह येतो, जो 80W सुपर फ्लॅश चार्ज सपोर्टसह येतो.

कॅमेरा:

फोटोग्राफीसाठी, सीरिजच्या बेस मोडमध्ये 50MP मेन, 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि 50MP टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे. तर, सिरीजच्या प्रो मॉडेलमध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 50MP टेलिफोटो लेन्स, 50MP पोर्ट्रेट आणि 50MP अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आहे. दोन्ही स्मार्टफोन 32MP सेल्फी कॅमेरासह येतात. हे स्मार्टफोन ColorOS 15 वर कार्य करतात.

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc.

Connect On :