लाँचपूर्वीच Oppo Find X8 सिरीजची भारतीय किंमत लीक! तुमच्या बजेटमध्ये आहे का किंमत?
Oppo Find X8 सिरीज उद्या 21 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच होणार
Oppo Find X8 मालिका उद्या 21 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे.
Oppo Find X8 सिरीजच्या फोनमध्ये Hasselblad कॅमेरा सेटअप दिला जाईल.
आगामी Oppo Find X8 सिरीज उद्या 21 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. या सिरीजमध्ये कंपनी Oppo Find X8 आणि Oppo Find X8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात येतील. लाँच होण्यापूर्वी या सीरिजची किंमत ऑनलाइन लीक करण्यात आहे. एवढेच नाही तर, कंपनीने फोनचे अनेक फिचर्स अधिकृत केले आहेत. ही सिरीज MediaTek Dimensity 9400 प्रोसेसरने सुसज्ज असेल. त्याबरोबरच, यात गेमिंगसाठी अनेक दमदार फीचर्स असतील. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Oppo Find X8 सिरीजची लीक किंमत आणि इतर तपशील-
Also Read: अखेर बहुप्रतीक्षित Redmi A4 5G स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी
Oppo Find X8 सिरीजची लीक किंमत
OPPO FIND X8 series expected price range
— Yogesh Brar (@heyitsyogesh) November 19, 2024
Find X8 : Rs 65-70k
Find X8 Pro : Rs 90k+
Pricing is good or bad?
What are your thoughts?
टिपस्टर योगेश ब्रारने ट्विटरद्वारे Oppo Find X8 सिरीजची किंमत ऑनलाइन लीक केली आहे. ताज्या लीकनुसार, Oppo X8 फोनची किंमत भारतात 65,000 ते 70,000 रुपयांच्या दरम्यान असेल. तर, Oppo X8 Pro ची किंमत जवळपास 90,000 रुपये असण्याची शक्यता आहे. हा फो स्टार ग्रे आणि पर्ल व्हाइट कलर ऑप्शन्ससह लाँच केला जाऊ शकतो. लक्षात घ्या की, Oppo Find X8 मालिका उद्या 21 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच होणार आहे. ही सिरीजचे लाँच उद्या सकाळी 10.30 वाजता भारतात सुरू होईल.
Oppo Find X8 सिरीजचे अपेक्षित फीचर्स
Oppo Find X8 सिरीजच्या अपेक्षित फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या सिरीजच्या फोनमध्ये 6.59 इंच लांबीचा आणि 6.78 इंच लांबीचा डिस्प्ले देण्यात आला आहे. चांगल्या परफॉर्मन्ससाठी Oppo Find X8 सीरीज MediaTek Dimensity 9400 प्रोसेसरद्वारे सुसज्ज असेल. ही नवीन चिप सध्याच्या प्रोसेसरपेक्षा 35% वेगवान असेल, असे म्हटले जात आहे. त्याबरोबरच, यात गेमिंगसाठी G925 GPU आहे.
फोटोग्राफीसाठी Oppo Find X8 सिरीजच्या फोनमध्ये Hasselblad कॅमेरा सेटअप दिला जाईल. त्याबरोबरच, आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP फ्रंट कॅमेरा आहे. प्रो मॉडेलमध्ये 50MP प्राथमिक कॅमेरा, 50MP टेलिफोटो सेन्सर आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर असेल. बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, फोनची बॅटरी 5,630mAh असू शकते. दुसरा फोन 5,910mAh बॅटरीसह येऊ शकतो.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile