Oppo Find X8 Series ची भारतीय लाँच डेट जाहीर! आगामी स्मार्टफोन्सचे प्री-बुकिंग देखील सुरु, पहा ऑफर्स
Oppo Find X8 Series भारतात पुढील आठवड्यात होणार लाँच
लाइनअप अंतर्गत, Oppo Find X8 आणि Oppo Find X8 Pro समाविष्ट
आगामी Oppo Find X8 सीरीजच्या फोनचे प्री-बुकिंग देखील आजपासून अधिकृत वेबसाईटवर लाईव्ह
प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Oppo ची लेटेस्ट स्मार्टफोन सिरीज Oppo Find X8 सीरीज चीनमध्ये गेल्या महिन्यात सादर करण्यात आली होती. या लाइनअप अंतर्गत, Oppo Find X8 आणि Oppo Find X8 Pro लाँच करण्यात आले होते. दरम्यान, आता हे दोन्ही स्मार्टफोन्स भारतात लवकरच दाखल होणार आहे. तसेच, कंपनीने या स्मार्टफोन्सची भारतीय लाँच डेट देखील जाहीर केली आहे.
एवढेच नाही तर, आगामी Oppo Find X8 सीरीजच्या फोनचे प्री-बुकिंग देखील आजपासून म्हणजेच 11 नोव्हेंबरपासून अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह झाले आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता जाणून घेऊयात Oppo Find X8 सिरीजचे भारतीय लॉन्चिंग तपशील-
Also Read: iQOO 13 लाँच होण्यापूर्वी iQOO 12 झाला स्वस्त! 50MP कॅमेरासह फोटोग्राफीचा मिळेल अप्रतिम अनुभव
Oppo Find X8 सीरीजची भारतीय लाँच डेट
आगामी Oppo Find X8 सीरीज पुढील आठवड्यात 21 नोव्हेंबर 2024 ला लाँच केली जाणार आहे. Oppo ने आपल्या अधिकृत X म्हणजेच आधीच्या ट्विटर हँडलवर Oppo Find X8 सीरीजची लाँच डेट जाहीर केली आहे. त्याबरोबरच, ही सिरीज आजपासून 999 रुपयांमध्ये प्री-बुक करता येईल.
🌟 Star Grey
— OPPO India (@OPPOIndia) November 11, 2024
🖤 Space Black
Discover the premium design of the #OPPOFindX8.
Tune into the global launch: 10:30 IST, November 21st 🌏
Know more: https://t.co/MhVxV2srdL#OPPOFindX8Series #FindYourBiggerPicture #OPPOAIPhone pic.twitter.com/Po95mKTKwS
प्री-बुकिंग ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना गिफ्ट हॅम्पर मिळेल. ज्यामध्ये कार चार्जर, इयरबड्स आणि टाइप-C VOOC केबल मोफत असेल. एवढेच नाही तर, 55% एक्सचेंज व्हॅल्यू देखील दिली जाईल. याव्यतिरिक्त, प्री-बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना 10% सूट आणि 24 महिन्यांची नो-कॉस्ट EMI देखील मिळणार आहे.
Oppo Find X8 सीरीजचे अपेक्षित तपशील
वर सांगितल्याप्रमाणे, Oppo Find X8 सीरीज चीनमध्ये गेल्या महिन्यातच लाँच करण्यात आली आहे. भारतात देखील ही सिरीज समान वैशिष्ट्यांसह येण्याची अपेक्षा आहे. त्यानुसार, फोनमध्ये 6.59 इंच लांबीचा डिस्प्ले असेल आणि X8 Pro मध्ये 6.78 इंच डिस्प्ले असेल. त्याचा रिफ्रेश दर 120Hz आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी, यात MediaTek Dimensity 9400 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याबरोबरच, या फोनमध्ये 16GB रॅम आणि 1TB इंटरनल स्टोरेज आहे. हे दोन्ही फोन Android 15 आधारित ColorOS 15 ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करतात.
या फोनमध्ये 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Find X8 Pro मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये 50MP मुख्य सेन्सर, दोन 50MP पेरिस्कोप लेन्स आणि 50MP अल्ट्रा-वाइड सेन्सर मिळेल. त्याबरोबरच, Find X8 फोनमध्ये 5630mAh बॅटरी देण्यात आहे. तर, Find X8 Pro मध्ये 5910mAh बॅटरी आहे. या दोन्ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंग आणि 50MP वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात. सिरीजच्या भारतीय मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन्स हा फोन भारतात लाँच झाल्यावरच पुढे येतील.
Reshma Zalke
Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile