Oppo Find X स्मार्टफोन आपल्या खास फीचर्स सह 12 जुलै ला भारतात केला जाऊ शकतो लॉन्च
Oppo ने काल Paris मध्ये एका इवेंट मध्ये आपला Oppo Find X स्मार्टफोन लॉन्च केला आहे, हा कंपनी ने बनवलेला सर्वात रचनात्मक स्मार्टफोन आहे.
Oppo ने काल Paris मध्ये एका इवेंट मध्ये आपला Oppo Find X स्मार्टफोन लॉन्च केला आहे, हा कंपनी ने बनवलेला सर्वात रचनात्मक स्मार्टफोन आहे. याव्यतिरिक्त कंपनी चे भरपूर स्मार्टफोंस मधील काही सर्वात प्रीमियम स्मार्टफोंस पैकी एक आहे. कंपनी कडून हा डिवाइस आता भारतात पण लॉन्च केला जाण्याची बातमी येत आहे, त्यामुळे बोलले जात आहे की हा डिवाइस 12 जुलै ला भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.
कंपनी च्या फंड सीरीज मध्ये हा स्मार्टफोन खूप काळानंतर लॉन्च केला गेलेला डिवाइस बनला आहे. हा पॅरिस मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याच्या किंमती बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाइस 999 यूरो च्या सुरवाती किंमतीत म्हणजे जवळपास Rs 78,500 च्या किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे. भारतात पण या स्मार्टफोन ची किंमत हीच असेल.
याचा अर्थ असा की जर हा डिवाइस याच किंमतीत भारतात लॉन्च केला गेला तर भारतीय बाजारात हा Huawei P20 Pro आणि Google Pixel 2 XL पेक्षा पण महाग डिवाइस ठरेल. तसेच कंपनी ने या डिवाइस सोबत याचा एक स्पेशल Lamborgini Edition पण लॉन्च केला आहे, हा डिवाइस Super VOOC टेक्नोलॉजी सह लॉन्च करण्यात आला आहे. आणि कंपनी चे म्हणेन आहे की हा डिवाइस फक्त 35 मिनिटांत पूर्णपणे चार्ज केला जाऊ शकतो. पण हा डिवाइस भारतात लॉन्च केला जाणार नाही.
डिस्प्ले बद्दल बोलायचे झाले तर Oppo Find X मध्ये 6.4 इंचाचा OLED डिस्प्ले आहे ज्यात फुल HD रेजोल्यूशन आहे. मोटोराइज्ड ब्लॉक मध्ये कॅमेरा आणि इतर सेंसर्स लपुन गेल्यामुळे Oppo जवळपास बिना बेजल चांगला स्क्रीन-टू बॉडी रेश्यो देण्यास समर्थ झाला आहे. डिवाइस मध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट, 8GB रॅम, 256GB स्टोरेज आणि 3,730mAh ची बॅटरी मिळते जी इतर कोणत्याही फ्लॅगशिप डिवाइस ला टक्कर देईल.
डिवाइस मध्ये कोणताही फिंगरप्रिंट स्कॅनर नाही म्हणून Find X यूजर्सना फेस अनलॉक चा वापर करावा लागेल, तसेच Oppo ने हेडफोन जॅक आणि वायरलेस चार्जिंग पण यात दिली नाही. हा फ्लॅगशिप स्मार्टफोन USB-C पोर्ट च्या माध्यामातून फास्ट चार्जिंग ला सपोर्ट करतो.