Oppo Find X स्मार्टफोन बद्दल समोर आली नवीन माहिती, स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट, 8GB रॅम आणि 256GB ची स्टोरेज असेल खासियत
Oppo पुन्हा एकदा फ्लॅगशिप बाजारात आपल्या नवीन स्मार्टफोन Oppo Find X सह या महिन्यात वापसी करणार आहे. या स्मार्टफोन बद्दल मागच्या काही काळात इंटरनेट वर चर्चा चालू आहे.
Oppo पुन्हा एकदा फ्लॅगशिप बाजारात आपल्या नवीन स्मार्टफोन Oppo Find X सह या महिन्यात वापसी करणार आहे. या स्मार्टफोन बद्दल मागच्या काही काळात इंटरनेट वर चर्चा चालू आहे. आता याचा लॉन्च जवळ असताना या स्मार्टफोन बद्दल खुप काही समोर आले आहे. Oppo Find X स्मार्टफोन साठी बोलले जात आहे की हा एक फ्लॅगशिप डिवाइस असेल. हा डिवाइस काही हाई-एंड स्पेक्स सह लॉन्च केला जाऊ शकतो.
असे बोलले जात आहे की डिवाइस स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच या डिवाइस मध्ये तुम्हाला एका 8GB रॅम सह 256GB ची स्टोरेज पण मिळणार आहे. हा डिवाइस पॅरिस मध्ये होणार्या एका इवेंट मधुन 19 जूनला लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचबरोबर असे पण बोलले जात आहे की या लॉन्च नंतर हा डिवाइस भारतीय बाजारात पण लवकरच येऊ शकतो.
TENAA च्या लिस्टिंग वर विश्वास ठेवल्यास याचा PAFM00 मॉडेल एका 6.3-इंचाच्या FHD+ AMOLED डिस्प्ले सह दिसला आहे, त्याचबरोबर याचे पिक्सल रेजोल्यूशन 2430×1080 पिक्सल आहे, फोन मध्ये एक 19.5:9 रेश्यो वाला डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. स्मार्टफोन एका नॉच डिजाईन सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोन मध्ये एक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.
Oppo Find X स्मार्टफोन बद्दल काही वेळापूर्वी एक पोस्टर लीक झाला होता, जो बद्दल खुप माहिती देत होता. OPPO ने आपल्या Weibo अकाउंट वर एक अधिकृत पोस्टर रिलीज केला आहे ज्यातून Find X चा खुलासा होत आहे. कंपनी ने Weibo वर पोस्ट केले आहे की, “हाय, खुप प्रतिक्षे नंतर” ज्यावरून समजते की कंपनी ला माहिती आहे OPPO फॅन्स आतुरतेने फ्लॅगशिप फोन ची वाट बघत आहेत ते.
OPPO ने आपल्या Weibo प्रोफाइल लॉगो पण Find X ठेवला आहे ज्या वरून स्पष्ट होते की हा कंपनी चा मोठा स्मार्टफोन असेल. Xiaomi Mi 8 आणि Mi 8 Explorer Edition च्या लॉन्च नंतर Find X ची घोषणा करण्यात आली होती.
मागच्या महिन्याच्या सुरवातीला OPPO ने OPPO Find X चे मोनिकर ट्रेडमार्क केले होते, ज्या वरून अंदाज लावला जाऊ शकतो की हा कंपनी चा आगामी फ्लॅगशिप फोन असू शकतो. मे मध्ये लीक झालेल्या फोटो वरून समजते की डिवाइस मध्ये नॉच डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल.