Oppo Find X बद्दल याच्या लॉन्च च्या आधी भरपूर माहिती लीक झाली आहे, पण यावेळी लीक झालेल्या फोटो वरून समोर येत आहे की हा डिवाइस एका कर्व स्क्रीन सह लॉन्च केला जाणार आहे.
Oppo Find X स्मार्टफोन बद्दल आता पर्यंत समोर आलेल्या माहिती वरून हा डिवाइस 19 जूनला लॉन्च केला जाणार आहे, तसेच याचे स्पेक्स आणि फीचर्स बद्दल पण खुप माहिती समोर आली आहे. आता एक नवीन लीक या डिवाइस बद्दल नवीन माहिती समोर घेऊन येत आहे, या डिवाइस बद्दल आलेल्या माहिती नुसार हा एक कर्व स्क्रीन सह लॉन्च केला जाऊ शकतो. असे बोलले जात आहे की ज्या प्रकारचा डिस्प्ले आपण सॅमसंग च्या फ्लॅगशिप स्मार्टफोंस मध्ये बघितला आहे, तसाच डिस्प्ले या डिवाइस मध्ये असेल.
एक लीक इमेज जी @bang_gogo च्या माध्यमातून किंवा असेही म्हणू शकतो की एक ट्विट च्या माध्यामातून समोर येत आहे. हे ट्विट तुम्ही इथे बघू शकता. यात स्पष्ट दिसत आहे की हा डिवाइस एका कर्व डिस्प्ले सह लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच या इमेज मधून हे पण समोर येत आहे की या डिवाइस बद्दल आधी आलेल्या लीक मध्ये पण अशीच माहिती देण्यात आली होती. जी पुन्हा परत आल्यामुळे खरी वाटत आहे.