Oppo Find X स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, 6.4-इंचाच्या डिस्प्ले सह 19 जूनच्या लॉन्च आधी दिसला

Oppo Find X स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर, 6.4-इंचाच्या डिस्प्ले सह 19 जूनच्या लॉन्च आधी दिसला
HIGHLIGHTS

Oppo Find X स्मार्टफोन बद्दल बोलले जात आहे की हा डिवाइस एका ड्यूल कॅमेरा सेटअप सह लॉन्च केला जाणार आहे आणि यात 5X Zoom क्षमता असेल.

Oppo पॅरिस मध्ये 19 जून ला एका इवेंट चे आयोजन करणार आहे, तिथे या इवेंट मध्ये कंपनी कडून Find X स्मार्टफोन लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच त्या नंतर हा डिवाइस भारतात पण लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. आता हा डिवाइस लॉन्च च्या आधीच दोन नवीन ओप्पो मॉडेल PAFM00 आणि PAFT00 TENAA वर दिसला आहे. या वेरिएंट्सना Oppo Find X स्मार्टफोन च बोलले जात आहे. 

TENAA ची लिस्टिंग पाहता याचा PAFM00 मॉडेल एका 6.3-इंचाच्या FHD+ AMOLED डिस्प्ले सह दिसला आहे, तसेच याचे पिक्सल रेजोल्यूशन 2430×1080 पिक्सल आहे, फोन मध्ये एक 19.5:9 रेश्यो वाला डिस्प्ले असेल. स्मार्टफोन नॉच डिजाईन सह लॉन्च केला जाऊ शकतो. फोन मध्ये एक क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. 

Oppo Find X स्मार्टफोन बद्दल काही दिवसांपूर्वी एक पोस्टर लीक झाला होता, जो याच्या विषयी भरपूर माहिती देत होता. OPPO ने आपल्या Weibo अकाउंट वर एक अधिकृत पोस्टर रिलीज केला आहे ज्यात Find X चा खुलासा होत आहे. कंपनी ने Weibo वर पोस्ट केले आहे की, “हाय, खुप दिवसांच्या प्रतिक्षे नंतर” ज्यावरून समजत की कंपनी ला माहिती आहे की OPPO फॅन्स आतुरतेने फ्लॅगशिप फोन ची वाट बघत आहेत. OPPO ने आपल्या Weibo प्रोफाइल लॉगो पण Find X ठेवला आहे ज्या वरून स्पष्ट होते की हा कंपनी चा मोठा स्मार्टफोन असेल. Xiaomi Mi 8 आणि Mi 8 Explorer Edition च्या लॉन्च नंतर Find X ची घोषणा करण्यात आली होती. 

मागच्या महिन्याच्या सुरवातीला OPPO ने OPPO Find X चे मोनिकर ट्रेडमार्क केले होते, ज्या वरून अंदाज लावला जाऊ शकतो की हा कंपनी चा आगामी फ्लॅगशिप फोन असू शकतो. मे मध्ये लीक झालेल्या फोटो वरून समजते की डिवाइस मध्ये नॉच डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. सध्या Find X बद्दल कोणतेही स्पेसिफिकेशंस समोर आले नाहीत. 

रुमर्स येत आहेत की यात Apple iPhone X आणि Xiaomi Mi 8 Explorer Edition प्रमाणे 3D फेशियल रेकोग्निशन साठी स्ट्रक्चर्ड लाइट 3D मोड्यूल असेल. त्याचबरोबर या स्मार्टफोन मध्ये सुपर-फास्ट 15 मिनट फ्लॅश चार्ज, 5x लोसलेस झूम आणि 5G कनेक्टिविटी असेल. 
 

Siddhesh Jadhav

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo