Oppo Find X स्मार्टफोन आज सेल साठी झाला उपलब्ध

Updated on 03-Aug-2018
HIGHLIGHTS

भारतीय बाजारात Oppo Find X 12 July ला लॉन्च करण्यात आला होता. त्यानंतर 30 जुलै पासून यासाठी प्री-आर्डर ची प्रक्रिया सुरू झाली होती, आणि 3 ऑगस्ट म्हणजे आज पासून याची विक्री सुरू झाली आहे.

Oppo Find X आज पासून ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यमांवर उपलब्ध व्हायला सुरवात झाली आहे. लॉन्च च्या वेळी सांगण्यात आले होते की हा डिवाइस एक्सक्लूसिवली फ्लिपकार्ट सोबत ऑफलाइन रिटेलर्स किंवा चॅनल्स च्या माध्यमातून पण आज पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि सांगितल्या प्रमाणेच झाले आहे. आज पासून हा डिवाइस सेल साठी उपलब्ध करण्यात आला आहे. तुम्हाला तर माहीतच आहे की हा डिवाइस भारतात 12 जुलै ला सादर करण्यात आला होता, त्यानंतर हा 30 जुलै पासून प्री-आर्डर केला जाऊ शकत होता. तसेच 3 ऑगस्ट म्हणजे आज पासून हा सेल साठी उपलब्ध करण्यात आला आहे. 

कंपनी ने याच्या सेल बद्दल एक ट्विट पण केले आहे. पण फ्लिपकार्ट वर अजूनही हा डिवाइस प्री-आर्डर साठी उपलब्ध आहे, असे वाटते आहे की हा डिवाइस 4 ऑगस्ट म्हणजे उद्या पासून सेल साठी येईल. 

स्पेक्स बद्दल बोलायचे तर Oppo Find X स्मार्टफोन 6.42-इंचाच्या एका AMOLED डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, Oppo Find X मध्ये कंपनी ने 2340×1080 पिक्सल ची 19.5:9 आस्पेक्ट रेश्यो वाली स्क्रीन दिली आहे. तसेच याचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 93.8 टक्के आहे. फोन एका एल्युमीनियम फ्रेम सोबत लॉन्च करण्यात आला आहे, त्याचबरोबर याच्या फ्रंट आणि बॅक वर तुम्हाला गोरिला ग्लास चे प्रोटेक्शन मिळेल. 

Oppo Find X मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला यात 8GB च्या रॅम सोबत 256GB ची स्टोरेज मिळत आहे. फोन मध्ये एक पॉप-अप ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर येतो. Oppo Find X मध्ये एक 25-मेगापिक्सल चा पॉप-अप सेल्फी कॅमेरा पण आहे. Oppo Find X मध्ये तुम्हाला एक इन्फ्रारेड सेंसर मिळेल, तसेच यात एक एक डॉट प्रोजेक्टर पण आहे, हा अॅप्पल च्या Face ID सारखाच आहे. 

फोन मध्ये तुम्हाला वाई-फाई, ब्लूटूथ, GPS,NFC, आणि 4G LTE चा सपोर्ट पण मिळेल, तसेच Oppo Find X कलर OS 5.1 आधारित एंड्राइड 8.1 Oreo सोबत लॉन्च करण्यात आला आहे. Oppo Find X मध्ये तुम्हाला एक 3,730mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. Oppo Find X Bordeaux Red आणि Glacier Blue रंगांमध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे हा Gradient डिजाईन मध्ये लॉन्च करण्यात आलेला डिवाइस आहे. 
 

Siddhesh Jadhav

Content Writer - Marathi

Connect On :