काही दिवसांपूर्वी Oppo ने भारतात आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X लॉन्च केला होता. आता इन्टरनेट वर हा डिवाइस वाइट बॅक पॅनल सह दिसला आहे. सर्वात आधी हा लीक झालेला फोटो MyDrivers वर दिसला होता आणि त्यावरुन समजते की कंपनी वाइट बॅक पॅनल सह Find X चा नवीन वेरिएंट लॉन्च करू शकते. कंपनी ने अजूनतरी डिवाइस च्या वाइट वेरिएंट बद्दल कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे असे ही होऊ शकते की कंपनी इतर कोणत्या तरी रंगात डिवाइस लॉन्च करेल. या लीक व्यतिरिक्त डिवाइस चा ट्रांसपेरेंट बॅक असलेला वेरिएंट पण दिसला आहे.
ट्रांसपेरेंट Find X चे फोटो K2Gadgets ने ट्विटर वर पोस्ट केले होते. फोटो मधून ट्रांसपेरेंट बॅक वेरिएंट मध्ये डिवाइस चे इंटरनल हार्डवेयर दिसत आहे. रिपोर्ट नुसार, यूजर ने डिवाइस च्या बॅक वरून कलर्ड फिल्म काढली आहे ज्यामुळे डिवाइस ला ट्रांसपेरेंट लुक मिळाला आहे.
स्पेक्स बद्दल बोलायचे तर Oppo Find X स्मार्टफोन 6.42-इंचाच्या एका AMOLED डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आला आहे, Oppo Find X मध्ये कंपनी ने 2340×1080 पिक्सल ची 19.5:9 आस्पेक्ट रेश्यो वाली स्क्रीन दिली आहे. तसेच याचा स्क्रीन टू बॉडी रेश्यो 93.8 टक्के आहे. फोन एका एल्युमीनियम फ्रेम सोबत लॉन्च करण्यात आला आहे, त्याचबरोबर याच्या फ्रंट आणि बॅक वर तुम्हाला गोरिला ग्लास चे प्रोटेक्शन मिळेल.
Oppo Find X मध्ये तुम्हाला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट मिळत आहे. त्याचबरोबर तुम्हाला यात 8GB च्या रॅम सोबत 256GB ची स्टोरेज मिळत आहे. फोन मध्ये एक पॉप-अप ड्यूल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो 16-मेगापिक्सल आणि 20-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर येतो. Oppo Find X मध्ये एक 25-मेगापिक्सल चा पॉप-अप सेल्फी कॅमेरा पण आहे. Oppo Find X मध्ये तुम्हाला एक इन्फ्रारेड सेंसर मिळेल, तसेच यात एक एक डॉट प्रोजेक्टर पण आहे, हा अॅप्पल च्या Face ID सारखाच आहे.
फोन मध्ये तुम्हाला वाई-फाई, ब्लूटूथ, GPS,NFC, आणि 4G LTE चा सपोर्ट पण मिळेल, तसेच Oppo Find X कलर OS 5.1 आधारित एंड्राइड 8.1 Oreo सोबत लॉन्च करण्यात आला आहे. Oppo Find X मध्ये तुम्हाला एक 3,730mAh क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा Gradient डिजाईन मध्ये लॉन्च करण्यात आलेला डिवाइस आहे.