digit zero1 awards

बहुप्रतिक्षित Oppo Find N3 Flip फोन भारतात Launch, मोठ्या Discount सह मिळेल नवा फ्लिप फोन। Tech News 

बहुप्रतिक्षित Oppo Find N3 Flip फोन भारतात Launch, मोठ्या Discount सह मिळेल नवा फ्लिप फोन। Tech News 
HIGHLIGHTS

Oppo Find N3 फ्लिप फोन अखेर भारतात लाँच

फोनवर 12000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो.

फोनमध्ये Hasselblad ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.

Oppo Find N3 फ्लिप फोन भारतात लाँच झाला आहे. हा कंपनीचा दुसरा फ्लिप स्मार्टफोन आहे. याआधी Oppo Find N2 Flip स्मार्टफोन देखील लाँच करण्यात आला आहे. Find N3 Flip ही Find N2 Flip ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. या फोनवर ऑफर्सदेखील उपलब्ध आहेत. चला तर जाणून घेऊयात फोनची किंमत, स्पेसीफिकेशन्स आणि ऑफर्स-

Oppo Find N3 Flip ची किंमत

कंपनीने Oppo Find N3 Flip फोनच्या 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 94,999 रुपये ठेवली आहे. फोनची विक्री 22 ऑक्टोबरला संध्याकाळी 6 वाजतापासून सुरू होईल. तुम्ही हा फोन फ्लिपकार्ट आणि ओप्पो इंडिया स्टोअरमधून खरेदी करू शकता. एवढेच नाही तर, या फोनवर तुम्हाला भारी ऑफर्स देखील मिळणार आहेत.

ऑफर्सबद्दल बोलायचे झाल्यास, फोनवर 12000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक देखील मिळू शकतो. याशिवाय, 24 महिन्यांची नो-कॉस्ट EMI देखील दिली जाईल. तसेच, एक्सचेंज ऑफर अंतर्गत, फोनवर 8000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस उपलब्ध आहे. हा फोन क्रीम गोल्ड आणि स्लीक ब्लॅक कलर ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे.

Oppo Find N3 Flip

डिस्प्ले

Oppo च्या फ्लिप फोनमध्ये 6.8 इंच लांबीचा FHD+AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर, फोनच्या मागील बाजूस 3.26 इंच लांबीचा कव्हर डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्लेसह कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस प्रोटेक्शन देण्यात आले आहे.

oppo find n3 flip

इतर तपशील

हा फोन MediaTek Dimensity 9200 प्रोसेसरने सुसज्ज आहे. फोनमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज उपलब्ध आहे. सुरक्षिततेसाठी, फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर समाविष्ट आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये Hasselblad ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP प्रायमरी कॅमेरा, 48MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 32MP टेलिफोटो सेन्सर समाविष्ट आहे. आकर्षक सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 32MP कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 4,300mAh आहे, ज्यामध्ये 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

Reshma Zalke

Reshma Zalke

Marathi Content Editor. I Love To Write Tech Related Articles And I Am Enjoying What I Am Doing. I Love To Write About New Smartphone, Laptops, Tech Gadgets And Mobile Apps etc. View Full Profile

Digit.in
Logo
Digit.in
Logo